ETV Bharat / state

Sanjay Raut Slams CM Shinde : संजय राऊत यांचा शिंदे फडणवीस शासनावर घणाघात - shinde fadanvis government

संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात करत भारतीय जनता पक्ष, केंद्रातील सरकार सर्व केंद्रीय आणि देशाच्या तपास यंत्रणांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला. शिंदे फडणवीस शासनाच्या नाकावर टिच्चून उद्योग गुजरातला पळवले गेले. दावोसला जाऊन काय मोठी मजल मारणार आहात, असा सवालही राऊत यांनी केला.

sanjay raut on shinde fadnvis government
संजय राऊत यांचा शिंदे फडणवीस शासनावर घणाघात
author img

By

Published : Jan 16, 2023, 3:46 PM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील येऊ घातलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना शिंदे फडणवीस शासन तसेच केंद्रशासन यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. राज्यातील गेलेले उद्योग तुमच्या नाकावर टिच्चून पळवून नेले. तुम्ही काय केले दावोसला जाऊन देखील काय होणार आहे? तसेच केंद्र सरकार सर्व शासकीय यंत्रणांवर दबाव तंत्र वापरत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशात गंगा आणि यमुनेमध्ये मृतदेह तरंगत होते. तसे महाराष्ट्रात बिलकुल होऊ दिलेले नाही. त्याचे कारण महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी अत्यंत पारदर्शी आणि व्यवस्थित काम झालेले आहे, असा दावा देखील त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या चौकशीच्या निमित्ताने केला.

प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबईत अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळात जे उद्योग, जे प्रकल्प, जे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्या कार्यक्रमाचे प्रकल्पांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा हा मानस म्हणजेच पंतप्रधानांच्या पदाला जी प्रतिष्ठा आहे, ती घालवण्याचा हा प्रकार आहे. जर त्यांना प्रतिष्ठा घालवायची असेल तर त्याला आपण काय करणार असे म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकार तसेच भारतीय जनता पक्षावर विशेष करून प्रहार केला.

संजय राऊतांचा शिंदे फडणवीस शासनावर हल्लाबोल : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दावोसमध्ये जाऊन काय करणार आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला. सगळ्याच जगातील उद्योगपती उद्योजक त्या ठिकाणी येतात. करारमदार करतात तसे नित्यनेमाने करार होतील. मात्र गुजरातमध्ये गेलेले उद्योग, ते परत आणणार आहेत का? दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार हे परत आणा. या शासनाच्या नाकावर टिच्चून हे उद्योग पळवले गेले आणि हे शासन केवळ पाहत राहिले. राज्यांमध्ये बेरोजगार असलेल्या जनतेला त्यामुळे रोजगार मिळू शकला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी शिंदे फडणवीस शासनावर केला. तसेच तुम्ही जे आता उद्योग आणत आहात त्याच्यातून किती रोजगार मिळणार आहे आणि तुम्ही किती रोजगार दिलेले आहेत ते जनतेला माहीत आहे. हे देखील अधोरेखित करायला ते विसरले नाहीत.

शासकीय यंत्रणांवर दबाव : केंद्रीय तपास यंत्रणेवर मोदी शासन प्रचंड दबाव टाकत आहे. याबद्दल देखील त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर आपली टीका रोखठोक स्वरूपात मांडली. ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या केंद्रीय असेल किंवा राज्याचा असेल शासकीय यंत्रणांवर दबाव टाकत आपल्या राजकीय हेतूंसाठी त्यांचा वापर केला जात आहे. आता केवळ न्यायव्यवस्था बाकी आहे. केंद्र शासनाची आता नजर न्यायव्यवस्थेवर आहे. कारण न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र शासनाच्या सर्व कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील याबाबत दुजोरा दिल्याचे राऊत म्हणाले.

सरकारची बदनामी करण्याचा डाव : इकबाल सिंह चहल यांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय करणार आहे. त्यासंदर्भात देखील राऊत यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, हा सर्व तपास सरकारवर दबाव टाकण्याचा आणि बदनामी करण्याचा एक डाव आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये गंगेच्या यमुनेच्या नदीत मृतदेह तरंगले. तसे काही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये झालेले नाही. त्याचे कारण कोरोना महामारीच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळात राज्यभर उत्तम संपर्क ठेवला. मुंबईमध्ये कोरोना महामारी रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये पारदर्शी पद्धतीने काम झाल्याचा दावा देखील त्यांनी केला.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मविआची बैठक : पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भात नाशिक येथील तांबे यांच्या उमेदवारीमुळे संघर्ष झाला. त्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक महाराष्ट्र विकास आघाडी करणार आहे. पदवीधर मतदार संघाच्या संदर्भात काँग्रेससोबत पुन्हा आम्ही बसणार आहोत. महाराष्ट्र विकास आघाडी यासंदर्भात बैठक करेल. थोड्यावेळापूर्वी शरद पवारांसोबत आमचे बोलणे झालेले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि थोरात यांच्याशी देखील संपर्क समन्वय सुरू आहे, अशी माहिती देखील राऊत यांनी पदवीधर मतदारासंघ निवडणुकीबाबत मांडली.

हेही वाचा : Konkan Graduate Election : कोकण पदवीधर निवडणूक अर्जासाठी आज शेवटचा दिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.