मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी होणार आहे. त्याचे कारण भारत जोडो यात्रेमध्ये अवघा देश सामील होत आहे. ही यात्रा जनतेला जोडण्यासाठी आहे. तसेच जम्मू काश्मीर हा भाग संवेदनशील आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तिथल्या नागरिकांशी भावनिक नाते आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
देशभरातून उदंड प्रतिसाद : भारत जोडो यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहेत. देशातील बहुतांशी राज्यातून ही पदयात्रा जनतेला जोडत जम्मू-काश्मीर या भागामध्ये आता पोचणार आहे. त्या ठिकाणी देखील जनतेने उत्स्फूर्तपणे भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. राहूल गांधी विषयी आपले अलोट प्रेम व्यक्त करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये शेवटच्या टप्प्यात जम्मू येथून सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी असेही सांगितले की जम्मू काश्मीर हा भाग संवेदनशील आहे. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भावनिक नाते देखील होते. त्यामुळे त्या ठिकाणी हजर राहणे महत्त्वाचे आहे.
संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात : दावोस या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गुंतवणूक करायला पाहिजे? कोणते उद्योग आणायला पाहिजे? यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री जाणार होते. बारा कोटी जनतेच्या हितासाठी उद्योग महाराष्ट्रात आणणs ही बाब महत्त्वाची आहे. मध्यंतरी आपले उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले. पण हे नुसते पहातच राहिले. आता पुन्हा उद्योग आणण्याची वेळ असताना हे पंतप्रधानांचा उद्घाटनाचा हा कार्यक्रम हे आखत आहेत. यांना शिवसेनेला हरवायचे आहे. मात्र उद्योग आणायचे नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र : संजय राऊत पुढे म्हणाले की पंतप्रधान ते स्वागत करायलाच पाहिजे मात्र राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी आधीच जे नियोजन होते. त्या नियोजनामध्ये बदल नको करायला. देशाचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांचे स्वागत होणे आणि त्यांच्या संदर्भातला प्रोटोकॉल या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल काहीच दुमत नाही. मात्र, राज्याचे प्रमुख हे उद्योगधंदे आणायचे सोडून अशा कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. यांना मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे. शिवसेनेला हरवणे यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण उद्योगधंदे येथे आणावे हे यांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिसत नाहीये.
प्रकाश आंबेडकरांसोबत आमचीदेखील बैठक : संजय राऊत यांना प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त भेटीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की ही गुप्त भेट नाही. सगळ्यांना कळाले म्हणजे ही काय गुप्त भेट नाही. आम्हालाही प्रकाश आंबेडकर भेटले होते. त्यामुळे राजकारणात या भेटीगाठी होत राहतात असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले.