मुंबई - शनिवारी एनआयएने सचिन वझे यांची 13 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांनी वझे यांना अटक केली. यासंदर्भात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एनआयएच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच एनआयएने केलेली ही कारवाई म्हणजे मुंबई पोलिसांच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे त्यांनी म्हटले.
हा मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रकार -
मुंबई पोलिसांची क्षमता जगाने मान्य केली आहे. त्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रकार आहे. याच पोलीस दलाने देशातील अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. त्यामुळेच या प्रकऱणाचा तपास गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला असून जिलेटीनच्या काड्यांसंदर्भात तपास करण्यासाठी एटीएस सक्षम असल्याचे राऊत म्हणाले.
राऊतांनी केले होते सुचक ट्विट -
तत्पूर्वी, संजय राऊत यांनी एक सुचक ट्विट केले होते. 'लोक तुमची प्रतिमा मलिन करतील, तुमच्या व्यक्तीमत्त्वावर डाग लावण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तुमचे चांगले कर्म ते तुमच्यापासून हिरावू शकणार नाही. त्यांनी तुमचे कसेही वर्णन केल्याने काही फरक पडत नाही. जे तुम्हाला ओळखतात, ते कायम तुमच्या चांगल्या कामाची कौतुक करतील', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरणातील तपास अधिकारी एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे कोण?