ETV Bharat / state

Sanjay Raut राजकारण म्हणजे मिमिक्री नाही- संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला - Sanjay Raut slammed Raj Thackeray

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू, राजू श्रीवास्तव आवडायचे. आवाज काढणे हे खूप झाले. आता मॅच्युर झाले पाहिजे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Nov 28, 2022, 10:18 AM IST

Updated : Nov 28, 2022, 2:19 PM IST

मुंबई : शिवरायांच्या अवमानावर शिंदे गट, भाजप नेते गप्प का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. संभाजीराजेंची भूमिका ही लोकभावना असल्याचे सांगितले. राजकारण म्हणजे मिमिक्री ( Sanjay Raut takes jibe at Raj Thackeray ) नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू, राजू श्रीवास्तव आवडायचे. आवाज काढणे हे खूप झाले. आता मॅच्युर झाले पाहिजे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रविवारी गोरेगावच्या नेस्को मैदानावर मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले ( Sanjay Raut slammed Raj Thackeray ) की, उद्धव ठाकरे पैशासाठी कोणाशीही संबंध ठेवतील. पैसे येत राहिले पाहिजेत एवढाच त्यांचा प्रयत्न आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल देखील केली. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

एकदा संपूर्ण महाराष्ट्र पाहा यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राजनीती म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला ओरिजिनल मिमिक्री पहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. असे आवाज काढून, हावभाव करून अमुक तमुक बोलण खूप झालं. आपल्या पदा पलीकडे जा आणि संपूर्ण महाराष्ट्र पहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती वेळ चालेल? या सर्वांनी एकदा बुलढाण्याची सभा पहावी. उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी असतील हे लोक ज्याप्रमाणे मेहनत आणि कष्ट केलेले आहेत त्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी चार दिवस करून दाखवावे, असे आव्हान संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार तोंड शिवून बसलेत पुढं बोलताना राऊत म्हणाले की, शिवाजी महाराजांचा ज्याप्रमाणे सातत्याने अपमान भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवताकडून होत आहे. भगतसिंग कोषारी व त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते यांना वाटत असेल की ज्या प्रमाणे राजकारण चालू आहे त्याप्रमाणे हा विषय देखील आम्ही बाजूला करू तर तस होणार नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींवर अन्याय होतोय त्यावरती विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि जो ॲक्शन प्लॅन आहे त्याबद्दल हालचाली सुरू आहेत. शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्यांचे आमदार हे अजून तोंड शिवून कसे बसलेले आहेत हे आम्ही बघत आहोत. त्याच लोकांनी शिवसेना फोडली. कारण, शिवसेनेला महाराष्ट्र स्वाभिमान आहे. काल छत्रपती संभाजी राजे व उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती लोकभावना आहे. महाराष्ट्राने अजून संयम राखलेला आहे महाराष्ट्रात राज्यपाल कोश्यारी व सुदाशु त्रिवेदी यांचा बचाव केला जात आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.