ETV Bharat / state

सचिन वाझेच्या लेटर बॉम्ब प्रकरणी संजय राऊतांकडून अनिल परब यांची पाठराखण

एनआयएच्या अटकेतील सचिन वाझेने लेटर बॉम्ब टाकला आहे. यातून ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊतांनी परब यांची पाठराखण केली आहे.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Apr 8, 2021, 3:06 PM IST

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात असलेल्या सचिन वाझेने मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केलेली आहे. कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या लेटर बॉम्ब प्रकरणात दिली आहे.

ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही - संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही

संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या बाजूने बॅटिंग करत केंद्रीय तपास यंत्रणे वरती टीका केली आहे. राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी रेड कार्पेट अंथरत आहेत. इतकं खालचं राजकारण महाराष्ट्र काय, देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊतांचा विरोधकांना इशारा

विरोधक हे सरकारमधील नेत्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडूनही काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत. अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का? यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्या देखील पत्र लिहू शकतात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

खोट्या पुराव्याचे पर्वत आम्ही भेदून पुढे जाऊ

झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या बाबतीत सध्या काय चालले आहे? हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण महाराष्ट्रात अशा प्रकारे दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. प्रत्येक परिस्थितीशी आणि बेडरपणे सामना करून संकट पळवून लावू. कोण कोणाच्या हातात हात घालून काम करत आहे हे स्पष्ट आहे. पण तुम्ही कितीही अडथळे निर्माण करा. कितीही खोट्या पुराव्याचे पर्वत उभे केले तरी आम्ही ते भेदून पुढे जाऊ, असेही राऊत म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे; खळबळजनक पत्र समोर आले आहे. सचिन वाझेने पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अॅड. अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. हे पत्र आज विशेष एनआय कोर्टात देण्याचा वाझेने प्रयत्न केला. मात्र, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच लेखी म्हणणे मांडावे, असे सांगून कोर्टाने हे पत्र नोंदीवर घेण्यास नकार दिला. दरम्यान, पत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कामगारांचा झुंजार नेता हरपला

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे काल (7 एप्रिल) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना खासदार संजय राऊत यांनी श्रध्दांजली वाहीली. 'दत्ता इस्वलकर यांचं जाणं म्हणजे सगळ्यांना चटका लावणारा आहे. श्रमिक कष्टकरी मुंबईतल्या गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवले. गिरणी कामगारांच्या संपानंतर गिरणी कामगारांना ज्या हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या, अनेकांचे कुटुंब देशोधडीला लागणार अशा वेळेचा तरुण कार्यकर्ता कामगारांच्या हक्कासाठी उभा राहिला. त्यावेळेस दत्ता इस्वलकर म्हणजे एक बुलंद आवाज होते. कामगार नेते खूप आहेत, पण आम्ही सगळे दत्ता इस्वलकर यांच्या आवाजाला गिरणी कामगारांचा आवाज मानू लागलो. गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळावी, यासाठी त्यांनी लढा उभारला. मालकांनी गिरणी मालकांनी जमिनी लाटल्या आणि कामगारांची देणी थकवली, असे अनेक प्रश्न घेऊन दत्ता इस्वलकर हे आयुष्यभर झगडत राहिले. मंत्रालय, कामगार न्यायालय या प्रत्येक ठिकाणी दत्ता इस्वलकर याच मुद्द्यांना घेऊन आम्हाला भेटत होते. असा बुलंद आवाज आज आपल्यातून निघून गेला. शिवसेनेतर्फे गिरणी कामगारांच्या या झुंजार नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो', असे राऊतांनी म्हटले आहे.

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकरांना श्रध्दांजली

हेही वाचा - मास्क नव्हे तर भारतीय संस्कृतीच खरे 'कोरोना कवच'; उशा ठाकूर यांचे दिव्यज्ञान!

हेही वाचा - कोरोना लसीचा पहिला डोस घेऊनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.