ETV Bharat / state

मोदीजी देश तुमच्यासोबत... पण सत्य काय आहे सांगा; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल - shivsena on modi

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या २० जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले असून त्यांनी सर्वांना सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे.

sanjay raut raise question to pm modi about indo china border clashes
मोदीजी देश तुमच्यासोबत... पण सत्य काय आहे सांगा; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल
author img

By

Published : Jun 17, 2020, 12:04 PM IST

Updated : Jun 17, 2020, 12:24 PM IST

मुंबई - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या २० जवानांना वीरमरण आले. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले असून त्यांनी सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, 'चीनच्या घुसखोरीला केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले २० जवान हुतात्मा झाले आहेत. आपण काय केले? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे का? पंतप्रधान जी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? ते सांगा. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचे आहे.'

दुसरीकडे, एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत म्हणाले की, भारत-चीन सीमेवर जे काही घडले त्यासाठी आम्ही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही. जवानांना वीरमरण आले त्यासाठी आपण सर्वजण जबाबदार आहोत. पंतप्रधान जे निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील, पण काय घडले आहे त्यांनी खरे सांगावे, असे म्हटले आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या मारहाणीत भारतीय सैन्य दलातील आणखी चार जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्य दलातीलही अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या संकटात मुंबईकरांवर पाणीपट्टी वाढीचा बोजा नको; भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

हेही वाचा - भारत-चीन सीमेवर तणाव; दुसरीकडे महाराष्ट्रात चीनची ५ हजार कोटींची गुंतवणूक

Last Updated : Jun 17, 2020, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.