मुंबई Sanjay Raut On Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आंतरराष्ट्रीय परिषदेला घाना देशात जाणार आहेत. त्यावरुन आता उबाठा गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राहुल नार्वेकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल नार्वेकर हे लोकशाही मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेला जात आहेत. मात्र राज्यात लोकशाहीचा खून झाल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे मुंबईत त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.
-
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP Sanjay Raut says, "The Speaker of the Maharashtra Legislative Assembly is in the delegation that is going to Ghana under the leadership of Om Birla to strengthen democracy on the international platform... What is the condition of… pic.twitter.com/eTja0RD4bp
— ANI (@ANI) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP Sanjay Raut says, "The Speaker of the Maharashtra Legislative Assembly is in the delegation that is going to Ghana under the leadership of Om Birla to strengthen democracy on the international platform... What is the condition of… pic.twitter.com/eTja0RD4bp
— ANI (@ANI) September 29, 2023#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP Sanjay Raut says, "The Speaker of the Maharashtra Legislative Assembly is in the delegation that is going to Ghana under the leadership of Om Birla to strengthen democracy on the international platform... What is the condition of… pic.twitter.com/eTja0RD4bp
— ANI (@ANI) September 29, 2023
काय म्हणाले संजय राऊत : लोकशाही मजबूत करण्यासाठी ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना इथं आंतरराष्ट्रीय परिषदेत जात आहेत. या शिष्टमंडळात राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्रात लोकशाहीची अवस्था काय आहे, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. इथल्या लोकशाहीची दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. मागील एका वर्षापासून राज्यघटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सरकार चालवण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
म्हणून राहुल नार्वेकरांना पाठवणार घानाला : लोकसभा सभापतींसोबत जाणाऱ्या शिष्टमंडळात अगोदर राहुल नार्वेकर यांचा समावेश नव्हता. मात्र महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा समावेश या शिष्टमंडळात करण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घाना देशाच्या दौऱ्यावर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात घाना इथं होणाऱ्या परिषदेत राहुल नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत. घाना देशात 66 वी राष्ट्रकुल परिषद होणार आहे. या परिषदेला राहुल नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा :