ETV Bharat / state

नेते राजकारणात असल्याने चीनची हिंमत वाढली-संजय राऊत

author img

By

Published : Dec 13, 2022, 9:46 AM IST

Updated : Dec 13, 2022, 11:37 AM IST

मोदी सरकार राजकारणामध्ये गुंतले आहे. त्यामुळे चीनची दडपशाही सुरू आहे. मोदी सरकारने सीमेकडे ( Sanjay Raut on India China border ) लक्ष द्यावे. नेते राजकारणात असल्याने चीनची हिंमत वाढली. तवांगचा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on India China standoff at Tawang ) यांनी म्हटले आहे.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई : मोदी सरकार राजकारणामध्ये गुंतले आहे. त्यामुळे चीनची दडपशाही सुरू आहे. मोदी सरकारने सीमेकडे ( Sanjay Raut on India China border ) लक्ष द्यावे. नेते राजकारणात असल्याने चीनची हिंमत वाढली. तवांगचा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on India China standoff at Tawang ) यांनी म्हटले आहे. चीन आपला खरा शत्रू आहे. आपण चीनचे आर्थिक सामर्थ्य वाढवित आहोत. तवांग सीमेवर जवान जखमी झाले असतील तर शोकांतिका आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

तवांगमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांसोबत चकमक झाली. तब्बल आठ दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. अडीच वर्षांपूर्वी गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतरची ही पहिली घटना आहे. देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत, असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित करत सीमेच्या सुरक्षेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. गुजरातच्या जल्लोषात सीमांकडे दुर्लक्ष झाले आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणांचे राजकारण करणाऱ्या पंतप्रधानांनी सीमांकडे लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले.

अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात ९ डिसेंबरला चीन सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले. २० जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. विरोधकांनी यावरुन केंद्र सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. संसदेत देखील हा मुद्दा तापणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला. गुजरातमधील तसेच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होते की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले होते, असा संशय राऊत यांनी घेतला.

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवतायत लडाख, डोकलामनंतर आता तवांगमध्ये चीन घुसला आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढल्याची चर्चा झाली आणि आता तवांगमध्ये घुसल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्याचेतवागमधील घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे. तवांगमध्ये शुक्रवारी चकमक झाली आणि आठ दिवसांनी हे प्रकरण समोर आले. जखमी सैनिक गुवाहाटीमधील रुग्णालयात उपचार घेत आहे. सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. आपले किती सैनिक जखमी झाले आहेत, काही जवान शहीद झाले आहेत का? यासंबंधी सरकार अधिकृत माहिती देत नाही. गलवानसंबंधी झाले तेच तवांगसंबंधी दिसत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सीमा उघड्या पडल्या तरी चालतील चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसत आहे, तिथे लक्ष दिले तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतून असल्याने चीन, पाकिस्तान आणि इतर सगळे शत्रू धडका मारत आहे आणि सरकार गांभीर्याने घेत नाही. उलट सगळ्यांनी आमच्या जल्लोषात सामील व्हा. सीमा उघड्या पडल्या तरी चालतील, दुष्मन घुसले तरी चालतील. असे दुर्दैवाने बोलण्याची वेळ आली आहे. राजकारण अत्यंत खालच्या थराला गेल्याचे टीकास्त्र राऊतांनी सोडले. तसेच देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारण, तपास यंत्रणा, विधानसभा, विरोधी पक्ष यावर लक्ष देण्यापेक्षा असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावे, असे संजय राऊत म्हणाले.

सरकार सीमा प्रश्नांवर गंभीर नाही अरुणाचल प्रदेश चीनच्या नकाशात दाखवला आहे. हा प्रश्न अधिक सावधतेने काम करणे गरजेचे आहे. अरुणाचल, तवांग, गलवान सीमांचे संरक्षण करायला हवे. पाकिस्तानला आपण नंबर एकचा शत्रू मानतो. मात्र, खरा शत्रू चीन आहे. तरीही आर्थिक ताकद वाढवण्याचे काम करत आहोत. सरकार सीमा प्रश्नांवर गंभीर नाही. आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला तर देशद्रोही ठरवले जाते. तुरुगांत टाकले जाते, खटले चालवले जातात, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

Last Updated : Dec 13, 2022, 11:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.