ETV Bharat / state

Sanjay Raut on ED probe मी कोणत्याही केंद्रीय यंत्रणांना दोष देणार नाही - संजय राऊत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ( Sanjay Raut on Shinde gov ) मला फोन केला. माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही. असा राजकीय सूड आपण पाहिला नाही. मी कोणत्याही केंद्रीय यंत्रणांना दोष देणार नाही, असे शिवसेना (उद्धव) नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on ED prob ) यांनी म्हटले.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Nov 10, 2022, 12:12 PM IST

Updated : Nov 10, 2022, 2:51 PM IST

मुंबई : मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ( Sanjay Raut on Shinde gov ) मला फोन केला. माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही. असा राजकीय सूड आपण पाहिला नाही. मी कोणत्याही केंद्रीय यंत्रणांना दोष देणार नाही, असे शिवसेना (उद्धव) नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on ED probe ) यांनी म्हटले. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत

सूडाचे राजकारण : मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दावा केला की त्यांची अटक राजकीय होती. अशा प्रकारचे सूडाचे राजकारण देशात यापूर्वी पाहिले गेले नव्हते. 100 दिवसांनंतर बुधवारी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झालेल्या राऊत यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले की ते लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी हा ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेना गटाचा मित्रपक्ष आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. खासदार म्हणाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटणार आहेत, परंतु त्यांनी याबद्दल तपशील दिला नाही.

राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस चालवत आहेत संजय राऊत म्हणाले, की मी सावरकर आणि टिळकांप्रमाणेच एकांतवासात होतो. माझी अटक देखील राजकीय होती आणि मी माझा वेळ चांगल्या हेतूसाठी वापरला. माझा पक्ष कोणताही असो, माझ्या कुटुंबाला आणि मला सहन करावे लागले. आम्ही सहन केले. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. हे जीवनात आणि राजकारणात घडते. पण असे राजकारण देशाने कधी पाहिले नाही. आपला देश दीडशे वर्षे परकीय राजवटीत होता, पण या प्रकारची राजकीय सूडबुद्धी आपल्याला देशात दिसली नाही. शत्रूंशीही चांगली वागणूक दिली गेली, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. राऊत यांनी दावा केला की राज्य उपमुख्यमंत्री फडणवीस चालवत आहेत. नवीन (एकनाथ शिंदे-फडणवीस) सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून जामीन : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत तुरूंगातून बाहेर आले आहेत. बुधवारी त्यांचा कोर्टाने जामीन मंजूर केला. संजय राऊत अर्थर रोड कारागृहातून बाहेर येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं व कारागृह ते संजय राऊत यांचं भांडुप येथील घर अशी मोठी रॅली काढली. संजय राऊत यांच्या जंगी स्वागतनंतर आज सकाळी त्यातली पहिली पत्रकार परिषद घेतले आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका तर चक्क फडणवीसंच कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांना टोला : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमचे मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका भाषणात म्हणाले होते की संजय राऊत यांना लवकरच अटक होईल. त्यांनी आता तुरुंगात एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी. भिंतींसोबत बोलण्याचा सराव करावा. मला त्यांना सांगायचं आहे मला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर होती. असं मी नाही कोर्टाचं म्हणणं आहे. एखादा व्यक्ती तुरुंगात जाणं हे काही चांगलं लक्षण नाही. आपण आपल्या शत्रू बाबत देखील असे चिंतू नये. मी तुरुंगात एकटा होतो एकांतात होतो. ज्याप्रमाणे सावरकर तुरुंगात गेले, लोकमान्य टिळक तुरुंगात गेले, अगदी आणीबाणीच्या काळात वाजपेयी तुरुंगात गेले त्याप्रमाणे मी देखील तुरुंगात होतो. मी माझा एकांत सत्कारणी लावला." असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

फडणवीसांचे कौतूक : "मला न्यायालयाने जामीन दिला. मी उगाचच कोणावर टिप्पणी करणार नाही. ना ज्यांनी मला अटक केली त्यांच्यावर आणि ना ही ज्यांनी हे षडयंत्र रचलं त्यांच्यावर. मला अटक करून त्यांना आनंद मिळाला ठीक. पण, मी कुणावर उगाच टीकाटिपणी करणार नाही. मला जे भोगायचं होतं ते मी भोगलं. माझ्या कुटुंबाने भोगलं. आपल्या महाराष्ट्रात नव सरकार आलं आहे. या सरकारने काही निर्णय चांगले घेतले. त्याच आपण निश्चितच स्वागत केलं पाहिजे. मी जे काही बघतोय हे सरकार जे काही निर्णय घेत ते निर्णय उपमुख्यमंत्री माध्यमांसमोर ठेवतात. त्यामुळे मला वाटतं उपमुख्यमंत्रीच हे सरकार चालवतात. घरांबाबत सरकारने जो काही निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. त्याच आपण कौतुक हे केलेच पाहिजे. अशाच काही विषयबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

भाजपबाबत भाषा बदललेली : दात्म्यान, तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांची भाजपबाबत मात्र काहीशी भाषा बदललेली दिसते. ईडीने अटक करण्याआधी सतत भाजपवर सडकून टीका करणाऱ्या संजय राऊत यांची आता मात्र भाजपबाबत मावळ भाषा वापरली. त्यामुळे या बदललेल्या संजय राऊत यांची माध्यमातून चर्चा होत आहे.

Last Updated : Nov 10, 2022, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.