ETV Bharat / state

Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'आमचं ठरलय दबावापुढे झुकायचं नाही'; 'इंडिया'च्या बैठकीवर राऊत यांची प्रतिक्रिया - CM Eknath Shinde

Sanjay Raut On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी इंडिया आघाडी समन्वय समितीची बैठक होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबद्दल रणनीती आखाली जाणार आहे.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 2:25 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis : इंडिया आघाडीच्या 14 सदस्यीय समन्वय समितीची आज पहिली बैठक दिल्लीत होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने मिशन 2024 चा नारा दिला. या मिशन 2024 च्या दृष्टीने अजाची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या आजच्या बैठकीत सीट शेअरिंग म्हणजेच जागा वाटपाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बैठकीत पुढील रणनीती, जागांचा ताळमेळ, निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम, रॅली यावर चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार यांच्या निवासस्थानी आज दिल्लीत को-ऑर्डिनेशन कमिटीची बैठक आहे. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांना आजच्याच दिवशीच ईडीचा समन्स आला आहे. हा भाजपाचा रडीचा डाव आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दबाव टाकून सूडबुद्धीचे राजकारण केलं जात आहे. आमच्या कमिटीमधील हेमंत सोरेन, अभिषेक बॅनर्जी आणि माझ्या स्वतःवर सुद्धा दबाव आहे. आम्ही यातून एकच मार्ग काढला आहे. काही झालं तरी या दबावापुढे झुकायचं नाही. अभिषेक बॅनर्जी आज येणार नाहीत. त्यामुळे देशाला एक वेगळा संदेश जाईल. त्यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहता येऊ नये म्हणून ईडीनं समन्स बजावलं आहे. लोकसभेच्या जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही. कारण, आमची लढाई हुकूमशाही उलटून टाकण्यासाठी आहे.

24 तासांत मराठा समाजाला आरक्षण देऊ : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) आमरण उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता उपोषण मागे मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्याआधी त्यांनी सरकारला काही अटी देखील घालून दिल्या आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, विश्वासाचं नातं सरकार बरोबर राहिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले होतं, आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. आमच्या घरात सत्ता आली तर 24 तासांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. हे सांगणारे फडणवीस आहेत. मग आता ते का देत नाहीत? तुमच्यावर विश्वास आता कोणी ठेवायचा? हे सरकार मनोज जरांगे पाटलाला मारू इच्छिते. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांची चिंता नाही.

50 खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाहीत : उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचंड संपत्ती असून त्यांचे लंडनमध्ये देखील घर असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला या संदर्भात माहिती नाही. पण, मला असं वाटतं कदाचित त्याच्या चाव्या अजय आशरकडे असतील. अशा आरोपांनी 50 खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाहीत. मुंबईसह ठाण्यात बिल्डरांच राज्य सुरू आहे. यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते. कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. MahaYuti Vs INDIA : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी 'महायुती'ची मुंबईत बैठक? तारखा एकच...
  2. President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित
  3. Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.