ETV Bharat / state

Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे

Sanjay Raut On CM : आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत. विरोधकांचा समाचारच नाही तर छातीवर पाय देऊन समाचार घेऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे.

Sanjay Raut On CM
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 11:58 AM IST

Updated : Nov 11, 2023, 12:26 PM IST

मुंबई Sanjay Raut On CM : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाणे-मुंब्रा दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत. विरोधकांचा नुसता समाचार नाही, तर छातीवर पाय देऊन समाचार घेऊ, असा दम उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलाय. ते आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

31 डिसेंबरनंतर शिंदे मुख्यमंत्री नसतील : मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "सध्या राज्यात मोगलाई सुरू आहे. आता आमच्या शाखांवर बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी या शाखांना मंदिर बनवलं होतं. पोलीस उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसही देण्यात आल्या आहेत. तसंच त्यांना तडीपार करण्याचीही धमकी देत आहेत. जे पोलीस आता आम्हाला अडवत आहेत, ते पोलीस त्यावेळी शाखा तोडताना कुठं होतं? जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत, त्यांना एवढंच सांगत आहोत की 31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील", या शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

आजारी पडल्यावर अजित पवार दिल्लीला गेले हे हास्यास्पद : "आपल्याकडं कोणी आजारी असल्यावर त्याला भेटायला जातात. मात्र अजित पवार आजारी असताना दिल्लीला अमित शाहांना भेटायला गेले हे हास्यास्पद आहे", असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय.

उद्धव ठाकरे आज मुंब्रा दौऱ्यावर : मुंब्य्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. आज उद्धव ठाकरे हे स्वतः मुंब्य्रातील शाखेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. यावेळी संजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळं ठाणे पोलिसांचा मुंब्र्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसंच ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण दौऱ्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांनाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 149 अंतर्गत नोटीसही देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :

  1. Desai On Sanjay Raut : "राऊतांना त्यांचेच खबरी एक दिवस अडचणीत आणतील"; - शंभूराज देसाई
  2. Sanjay Raut On Eknath Shinde : 'कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी स्थिती'; मराठा विरुद्ध ओबीसी मंत्र्यांमधील वादावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. All Party Meeting on Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीच्या निमंत्रणावरुन ठाकरे गटाचं आधी 'मानापमान' नंतर 'तळ्यात, मळ्यात', 'शेवटी सूर राहू दे'

Last Updated : Nov 11, 2023, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.