मुंबई Sanjay Raut : सध्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार? निर्णय कोणाच्या बाजूने लागेल? यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे संसदेत नव्याने आणलेल्या महिला धोरण विधेयकासंदर्भात शिवसेना शिंदे गटाने व्हीप जारी केला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास ठाकरे गटाच्या चार खासदारांवर कारवाई होऊ शकते. यासह देश आणि राज्यातील विविध विषयांवर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut On CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एकही खासदार संसदेत दिसणार नाही : मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकावरील चर्चदरम्यान सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे यासाठी ते व्हीप जारी करणार असल्याच्या चर्चा आहेत. फक्त 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊ द्यात या निवडणुका नंतर हे कुठेच दिसणार नाहीत. यापैकी एकही खासदार संसदेत नसेल आणि मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल हे पक्क आहे.
मुंबईला पुन्हा जुनं वैभव मिळवून द्या : मुख्यमंत्र्यांच्या अचानक रद्द झालेल्या प्रदेश दौऱ्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांच्यामुळेच हा दौरा रद्द झाला. दुष्काळजन्य परिस्थिती आहे. हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. कुठे चालले होते माहीत नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. महाराष्ट्रातली गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे ती आधी इथे आणा. मुंबईला पुन्हा जुनं वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? सरकारी पैशाचा अपव्यय. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, नागपूर बुडालं आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर कळालं का? असे संजय राऊत म्हणाले.
नैतिक भान असायला हवं : महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होता? सिने कलाकारांसोबत? उत्सव साजरे करत होता? दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावं याच नैतिक भान तुम्हाला असायला हवं. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख जाणून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूर मध्ये जाऊन लोकांचं दुःख दूर करायला हवं होतं.
सुप्रिया सुळेच जिंकणार : राज्यात सध्या बारामती लोकसभा चर्चेचा विषय आहे. ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेमुळे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मला नाही वाटत असं होईल, ह्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं आम्ही सुद्धा राज्य केलं आहे आणि आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहित आहे आणि बारामतीचे राजकारण सुद्धा माहित आहे. कुणीही निवडणूक लढली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार.
शंभर कोटीच्यावर कांदा पडून : राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे. जवळपास शंभर कोटी रुपयांचा कांदा पडून आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री मुंबईत येऊन गेले. या राज्याला कृषिमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? शंभर कोटीच्यावर कांदा पडून आहे. कांदा व्यापारी अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. तुमचे मंत्री आले आणि गेले, त्यांनी दिल्लीत बोलावलं. प्रश्न महाराष्ट्रात मंत्री आले आणि काय म्हणाले दिल्लीत या.
हेही वाचा -
- Sanjay Raut : पत्रकार परिषदेला मी जाणार असल्यानं...; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Sanjay Raut : ...म्हणून जरांगे पाटलांचं उपोषण संपवलं; राऊत स्पष्टच बोलले, कॅबिनेटच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याचा इरादा