मुंबई : बेईमान व्यक्तीशी तुलना करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात आहे. राज्यपालांच्या विरोधात निंदा करणारा ठराव केला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली (Sanjay Raut on BJP leaders disrespect statements) आहेत. उद्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिला दौरा अशी त्यांनी माहिती दिली.
सरकारला धारेवर धरले : राज्यपाल भगतसिंह कोशारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपहार्य वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राज्यपालांचे तसेच त्रिवेदी यांचे पुतळे जाळण्यात आले. अनेक मोर्चे काढण्यात आले. हे वातावरण अद्याप शांत झालेले नाही. तोच बुधवारी प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे नवा-वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट दिल्लीला सवाल करत सरकारला धारेवर धरले (Sanjay Raut on BJP leaders disrespect statements) आहे.
महाराजांचा अपमान करण्याची स्पर्धा : यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, खोके सरकार आणि राज्यपाल ह्यांच्यात कोण शिवाजी महाराजांचा अपमान करेल, यासाठी स्पर्धा सुरू आहे. कोन बनेगा करोडपतीप्रमाणे दिल्लीने सांगितले म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे. ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्तीसोबत करत आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीत ठराव मंजूर करा हे मुग गिळुन महाराजांचा अपमान सहन करत आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली (Mangal Prabhat Lodhas controversial statement) आहे.
उत्तर महाराष्ट्राचा करणार दौरा : तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यावर संजय राऊत पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बांधणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत माहिती देताना राऊत म्हणाले की, नाशिक उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिकांच्या भेटी घेणार आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद आहे. बुलढाणा जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ४० खोके आमदार गेले असले तरी जनता आमच्या सोबत (Sanjay Raut on Mangal Prabhat Lodha) आहे.