ETV Bharat / state

Sanjay Raut on Belgaum border शिवरायांचा अवमान पाहत बसणारे सीमावादावर काय न्याय देणार आहेत - संजय राऊत - Sanjay Raut on Belgaum border

२० लाखांचा मराठी भाषिक कर्नाटकाच्या घश्यात घातला आहे. महाराष्ट्र सरकारने हिमतीने पंतप्रधानांशी बोलावे व जनतेला कळवावे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. ( Sanjay Raut on Belgaum border dispute )

Sanjay Raut on Belgaum border
संजय राऊत
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:03 AM IST

Updated : Nov 22, 2022, 12:04 PM IST

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ( Sanjay Raut on Belgaum border dispute ) घ्यावा. शिवरायांचा अवमान पाहत बसणारे सीमावादावर काय न्याय देणार आहेत? कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी अत्यंत जागरुक आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत काय बोलत आहोत, याचे रेकॉर्डिंग जनेताला दाखवावे. कर्नाटक सीमावाद हा राजकीय ( Sanjay Raut Slammed Shinde gov ) प्रश्न आहे. त्यावर दोन राज्यपाल काय निर्णय घेणार? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालपदाची प्रतिष्ठा संपली : २० लाखांचा मराठी भाषिक कर्नाटकाच्या घश्यात घातला आहे. महाराष्ट्र सरकारने हिमतीने पंतप्रधानांशी बोलावे व जनतेला कळवावे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. कोणत्याही राज्यपालावर असा राग कधीच नव्हता. लोक आंदोलन करत आहेत. भाजपने राजभवनाला पक्षाचे मुख्यालय केल्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालपदाची प्रतिष्ठा संपली आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केली आहे. आम्ही त्यांना सरकार मानायला तयार नाही. ते भाजपचा नम्र कार्यकर्ता आहेत. पण आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलतात, त्यांनी महाराष्ट्राबाहेर थट्टा केली आहे का? असेही संजय राऊत यांनी म्हटले.

सुटकेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेल्याने ते आज कुणाला भेटणार ? कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर बाहेर असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत गेले आहेत. 100 दिवसांनंतर सुटका झालेले राऊत सुटकेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेल्याने ते आज कुणाला भेटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्याची माहिती मिळतात पत्रकारांनी दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचे भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला व बेळगाव प्रश्नावरून भाजप व शिंदे गटावर सडकून टीका केली.

एकनाथ शिंदेंना मी वारंवार सांगत होतो : माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमावाद हा मागच्या अनेक वर्षांपासून चा मुद्दा आहे. आता या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या अनेक वर्षात या प्रश्नावर कित्येक मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या प्रश्नावर युती सरकारच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांची देखील बेळगाव प्रश्नाबाबत नियुक्ती करण्यात आली होती. हे सर्व मंत्री किती वेळा बेळगावात गेले? त्यांनी किती वेळा स्थानिक लोकांशी चर्चा केली? किती वेळा कर्नाटक प्रशासनाशी चर्चा केली? मी वारंवार एकनाथ शिंदे यांना सांगत होतो आपण बेळगावत गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन या प्रश्नावर चर्चा केल्या जाव्यात. या प्रश्नावर ना चंद्रकांत पाटील बेळगावत गेले ना आताचे मुख्यमंत्री गेले. ते का गेले नाहीत?

महाराजांचा अपमान सहन करणारे : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आता पुन्हा एकदा दोन मंत्र्यांची या प्रश्नावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन मंत्री काय वेगळे दिवे लावणार आहेत ? सगळ्यात आधी आपण बेळगाव आत जायला हव. तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायला हवा मराठी तरुणांवर जे काही खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते पहिले मागे घ्या. हे सगळं हिमतीने सांगा नाहीतर हा महाराष्ट्र आहे हे दाखवून द्या. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतात. तो सहन करतात ते सीमावरती भागातील प्रश्न काय सोडवणार ? तिथल्या मराठी तरुणांना कसा न्याय देणार ? असा प्रश्न देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मोदींच्या भेटीचे रेकॉर्डिंग जनतेला ऐकवा : याच सीमा प्रश्न विषयी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, एक नोव्हेंबर हा बेळगाव सीमावरती भागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्यावेळी सरकारमधील किती मंत्री नेते बेळगाव आत गेले होते? तेव्हा फक्त आमचे शिवसैनिकच बेळगावत गेले होते. तुम्ही बेळगाव प्रश्नावरून पंतप्रधानांची चर्चा करणार असाल तर या भेटीत तुम्ही त्यांच्याशी नेमकी काय बोलताय याचं रेकॉर्डिंग करा आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला ऐकवा. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Last Updated : Nov 22, 2022, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.