ETV Bharat / state

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांवर गद्दरांची गाडी चालवण्याचे दिवस; संजय राऊतांचा हल्लाबोल - नवीन संसद उद्धाटन

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना परत एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नवीन संसदेच्या उद्घाटन निमंत्रणावर राऊतांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, आमच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याचे दिवस आले आहेत.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : May 25, 2023, 2:55 PM IST

मुंबई : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे काल गद्दारांची गाडी चालवत होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जे लोक मोदींजीची चाटुगिरी करतात त्यांना दिल्लीला बोलवले जाते, असा टोलाही संजय राऊत यांनी नवीन संसद उद्धाटनाच्या आमंत्रणावरुन लागला.

उद्घाटन सोहळा हा फक्त राजकीय इव्हेंट : संजय राऊत म्हणाले आहेत की, देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही. त्यांना आमची एवढीच विनंती आहे की, या उद्घाटन सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतीला सामावून घेतले पाहिजे. राष्ट्रपती या महत्त्वाच्या पदावर असून तो त्यांचा अधिकार आहे. देशाच्या घटनेवर, संविधानावर हल्ला होत आहे, याला आमचा विरोध आहे. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचे साधे नावदेखील नाही. नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा फक्त राजकीय इव्हेंट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठरवले असेल तर ते चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच प्रधानमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालावे आणि स्वतः राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण द्यावे असेही राऊत म्हणाले.

आमच्या सारख्यांचे काय? : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावले आहे का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीमध्ये बोलावले जात नाही. जे चाटुगिरी करतात, मोदींचे भजन करतात, त्यांनाच दिल्लीला बोलावले जाते. राष्ट्रपती यांच्या सहीने संसद सुरू होते. त्यांच्या अभिवाचनाने संसद चालते. लोकशाहीच्या भूमिका त्या ठरवतात. संविधानाच्या प्रमुख राष्ट्रपती आहेत. जिथे राष्ट्रपतीलाच बोलावलं नाही. तिथे आमच्यासारख्यांचं काय? पण न बोलता ही पंक्तीमध्ये बसणारे खूप लोक असतात, ते जात असतील,असा टोलाही राऊत यांनी या प्रसंगी लगावला.

गद्दारांच्या गाड्या चालवत होते : शिवडी ते नावाशेवा दरम्यानचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाचा आढावा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांची गाडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस चालवत होते. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि फडणवीसांना टोला लगावला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कुठल्या व्यक्तीला विरोध केला नाही. फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याची वाईट वेळ अजूनतरी आमच्यावर आली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावे. बाळासाहेबांनी कधी गद्दारांना मांडीवर घेतले नव्हते. गद्दारांना लाथा मारा असे सांगितले होते. पण देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते.

साप आणि नागाची पूजा : काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडवणीस यांनी सापनाथ आणि नागनाथ जरी एकत्र आले तरी ते मोदींचा पराभव करू शकत नाहीत, असा टोमणा मारला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे साप आणि नागाची पूजा होते. त्यावर तुम्हाला दुःखी व्हायचे कारण काय. सर्वांना भेटायला पाहिजे. एक दुसऱ्यांबरोबर चर्चा व्हायला हवी. देशात लोकशाही मेली असताना मोदी जगात कसला डंका वाजवताय? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. Satyendr Jain Admitted To DDU : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
  2. charge sheet against Awhad : डॉ. जितेंद्र आव्हाडाच्या अडचणीत वाढ, ठाणे पोलिसांकडून 500 पानाची चार्जशीट दाखल
  3. Uddhav Thackeray News: राष्ट्रीय नेत्यांच्या मातोश्रीवर वाढल्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे यांचे महत्त्व का वाढत आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.