मुंबई : नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. राज्यात महापुरुषांचा अवमान, सीमावाद अशा अनेक प्रश्नांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत आहेत. सीमा भागातील गावांच्या प्रश्नांवरून विरोधक सभागृहाच्या पायऱ्यांवर रोज निदर्शनात करत आहेत. या सर्व संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली.
तिकडे गुंगीचे औषध दिले काय? यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे क्रांतीकारक मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे हे पाहीले पाहीजे. मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमिन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात. तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र असतील किंवा मुख्यंमत्री असतील तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. स्वताच्या मुद्यावर तुम्ही तासभर बोलतात. बाजूचा मुख्यमंत्री रोज बेअब्रू करतात. तुम्ही दोघे दिल्लीत गेलात तेंव्हा गुंगीचे औषध दिले काय. तिकडून आले आणि गप्प ते गप्पच आहेत.
110 कोटींत वाटणी आहे का? पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे लेचेपेचे सरकार आहे. ते घाबरले आहे ते. इथे आम्ही सर्व सिमा प्र्शावर एकत्र आहोत. सर्व पक्ष एकत्र येवू. तुम्ही सिमा प्रश्नावर भुमिकाच घेत नाही. मुग गिळून गप्प बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना काढले पाहीजे. हे घटनाबाह्य सरकार आहे? न्न्यायालय म्हणतेय भ्रष्टाचार झाला. तुम्ही किती रंगसफेदी करा. पण काही उपयोग नाही. त्यात उपमुख्यमंत्री वकिली करतात. यात वाटणी आहे का?
मुख्यमंत्री उत्तर द्या : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या चित्ररथा विषयी बोलताना राऊत म्हणाले की, क्रांतीकारक मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. त्यांच्या स्वाभिमानी आमदारांनी उत्तर द्यावे असे का होत आहे यावर. हे रोज नवनविन कारणे शोधत आहेत. यांना भिती वाटते आहे भारत जोडो यात्रेची. भारत जोडो यात्रा सुरू राहील.