मुंबई : आज मराठी पत्रकार दिन आहे. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे संजय राऊत लवकरच पुन्हा एकदा जेलमध्ये ( Sanjay Raut criticize Narayan Rane ) जातील. ते स्वतःहून त्यांचा जेलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करत ( Narayan Rane Will Spend 50 Years In Jail ) आहेत. अशी टीका राणेंनी राऊतांवर केली. या टीकेला उत्तर आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
तुमचा कणा ताठ असला पाहिजे : ज्यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की,"मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली. राजकारणामधल्या अनेक पदावर मी राहिलो. पक्षाचा नेता राहिलो. खासदार राहिलो. तरीही मी जगतो पत्रकार म्हणून. रोज सकाळी उठतो, वृत्तपत्र वाचतो, सामनाच्या कार्यालयात जातो, अग्रलेख लिहितो कुठे असलो तरी. जगाच्या पाठीवर पत्रकारितेमध्ये खूप बदल होत जाताना मी पाहिले गेल्या 40-45 वर्षांमध्ये. तरी मला असं वाटतं की या समाजामध्ये बदल करण्याची बदल घडवण्याची ताकद ही पत्रकारितेमध्ये आहे. फक्त पत्रकारांचा कणा हा ताट असला पाहिजे. जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचा असला तरी स्वतःला पत्रकार मानणाऱ्यांनी हातात लेखणीही घेतलीच पाहिजे. तुम्हाला सर्व नवीन पत्रकारांना माझ्या शुभेच्छा."
ठेकेदार गेले, कार्यकर्ते इथेच : आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार ( Thackeray group 50 leaders Join Shinde group ) आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "जे पदाधिकारी गेले म्हणताय त्यांची तुम्हाला नाव माहिती आहेत का? चार पदाधिकाऱ्यांची नाव सांगा. असे अनेक जण येत जात असतात. तुम्ही मला प्रश्न विचारला तुम्हाला नाव माहित नाही. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे. ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील. पण, प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहे." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
50 वर्ष तुरुंगात राहावे लागेल : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की," नारायण राणे माझ्यावर बोलताना सांभाळून. पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्षात घ्या मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये. तुम्हाला इतकेच वादविवादाची हौस असेल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. मी परत सांगतो हे काय मला जेलमध्ये टाकणार? मी हिमतीने माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखा पळून नाही गेलो. तुम्ही मला जेलमध्ये टाकणार म्हणजे तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? ह्या सर्वांची नोंद आहे माझ्याकडे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले ( Sanjay Raut Wrote letter Chief Justice ) आहे. त्यांना इथली सर्व हकीकत सांगितले आहे नारायण राणे तुमची जर सर्व प्रकरण बाहेर काढली तर तुम्ही पन्नास वर्षे जेलमध्ये राहावं लागेल."( Narayan Rane will spend 50 years in jail ) असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिला आहे.