मुंबई: शिंदे फडणवीस सरकारमध्ये धमक्या देणाऱ्या गुंडांना संरक्षण दिले जात आहे. माझे कर्तव्य म्हणून या सरकारला माहिती दिली आहे. आमच्या जीवाचे बरेवाईट व्हावे, हीच सरकारची इच्छा आहे, अशी टीका संजय राऊत यांना शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. संजय राऊत यांना धमकी देणारा फोन कॉल सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक दंगलीमागे गेल्या साधारण दहा वर्ष मागे राजकारण आहे. ज्यांना धर्मांधतेचे राजकारण करायचं आहे अशांना एक चटक लागली आहे. महाराष्ट्रामध्ये आजही भाजप महानगरपालिका निवडणूक घ्यायची हिमत दाखवित नाही. धार्मिक उन्माद निर्माण करून निवडणुकांना सामोरे जायचे. तुमचं हिंदुत्व इतके तकलातू आहे का? की कुठल्यातरी मुगल राजाचे फोटो दाखवले. तुमचे हिंदुत्व धोक्यात आले? अर्धशिक्षित मुलांची माथी भडकवायची आणि राज्य अस्थिर करायचे. त्या आधारावर निवडणुकांना सामोरे जावे लागायचे. हा यांचा डाव आहे. महाराष्ट्राला मागे आणणार हे काम सुरू आहे.
महाराष्ट्रातला सगळा रोजगार सगळे गुंतवणूक गुजरात राज्यात न्यायचे. अशा प्रकारचं हे कारस्थान सुरू आहे. दुर्दैवाने आपली लोक त्याला बळी पडतात. कर्नाटकात बजरंग बली हनुमान चालीसाचे तंत्र चालल नाही. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना औरंगजेब घ्यावा लागला. हिंदुत्वाच्या नावाने उन्माद तयार करायचा हे हिटलरपेक्षा भयंकर आहे-खासदार संजय राऊत
तुम्हाला औरंगजेबाबद्दल प्रेम का आले: पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या सरकारने आम्ही कसे संभाजीनगर आणि धाराशिव केले याच्या टिमक्या वाजविल्या होत्या ना? आता त्यांच्या लोकांनी हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही पुन्हा पुन्हा संभाजीनगरला औरंगाबाद म्हणतात धाराशिवला उस्मानाबाद अधिकृतपणे म्हणत आहेत. तर तुमचे कुठे गेलं हिंदुत्व? तुम्हाला औरंगजेबाबद्दल प्रेम का आले? याचं उत्तर द्या. भाजपाच्या काही उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो. तुमच्या मनातील औरंगजेब आधी काढा.
मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना : बजरंग बलीच्या नावाने कर्नाटकात दंगली घडवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात देखील हे प्रयोग अनेक वेळा झाले ते यशस्वी झाले नाही. अमित शाह नांदेडच्या दौऱ्यावर येऊ द्या. हा देश त्यांचा आहे. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्फोट होणार आहेत. त्या संदर्भात अमित शाह यांनी त्यांना आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळ बदलाचे आणि काही मंत्र्यांना वगळण्याचे ते ओझे घेऊन ते कश्मीरला गेले असतील. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला तर मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना या अमित शाह यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे, अशी टीका देखील खासदार राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा-