मुंबई - ईशान्य मुंबईतून आज राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
ईशान्य मुंबईतून मंगळवारी युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज आघाडीचे उमेदवार पाटील यांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुलुंड पूर्व येथील संभाजी मैदानातून रॅलीला सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर मुलुंड पूर्व भागातील नागरिकांच्या भेटी घेत निवडणूक कार्यालयापर्यंत ही रॅली आली. पाटील यांचा अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना आणि रॅलीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते चरणसिंग सपरा आणि महिला आघाडीच्या नेत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.