मुंबई Sanatana Dharma Remark Row: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडियावर ‘दिवट्या’ म्हटलयं. मुख्यमंत्री यांनी पोस्टमध्ये म्हटलयं की, सनातन धर्म संपविण्याची उदयनिधीने आज भाषा केलीय. सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असणार आहे. असे अनेक स्टॅलिन येऊन जाणार आहेत. पण स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसच्या चिदंबरम यांचाही बुरखा फाटलाय. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज असल्याची भाषा कार्ती चिंदबरम यांनी केली आहे. असे म्हणणं म्हणजे हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडियावर इंडिया आघाडीसह उदयनिधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यांनी एक्समध्ये म्हटलय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारताचे काम सुरू असताना देशाचा जगभरात जयजयकार होतोय. तरीही विरोधकांना देशाचा प्रगती पाहवत नाही. त्यातुनन अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर इंडिया आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे उद्योग पाहून प्रचंड वेदना झाल्या असत्या. उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करणं अपेक्षित आहे. आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून त्यांनी फोटो काढावेत. कारण त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटलाय. Ekanth Shinde slammed DMK leader Udhaynithi Stalin
-
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे,… pic.twitter.com/M9f8Hldyw2
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे,… pic.twitter.com/M9f8Hldyw2
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2023तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे,… pic.twitter.com/M9f8Hldyw2
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2023
इंडिया आघाडीचा बुरखा फाटला आहे. त्यांचे हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र इंडिया आघाडीसारख्या शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती संपू शकणार नाही. कारण हिंदू धर्म आणि संस्कृती भारतीयांच्या रक्तात आणि डीएनएमध्ये आहे. ही समजण्याची कुवत असायला हवी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग काँग्रेसनंच शोधून काढला- काँग्रेसनं कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप केलंय. अशा विधानातून ‘इंडी’आघाडीचा हिंदूविरोधी चेहरा जगासमोर आलाय. कॉंग्रेसनं राम मंदिराला विरोध करत आजवर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतल्या आहेत. हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग काँग्रेसनंच शोधून काढला, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे. पुढे मुख्यमंत्री यांनी पोस्टमध्ये म्हटले की, चिदंबरम पुत्रानं मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीप्रमाणंच आहे.
हेही वाचा-