मुंबई : अमोल कीर्तिकर हे गजान कीर्तिकरांचे पुत्र आहेत. ते गजानन कीर्तिकरांच्या निर्णयात सहभाग नाहीत. ते पक्ष सोडून गेल्याचे दु:ख आहे. महाराष्ट्र आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून देशाच्या नकाशावरून ( industries out going from Maharashtra ) पुसण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्प कोण ओरबडतय ( Sanjay Raut on mid term election ) यावर चर्चा करा. महाराष्ट्रात मध्यावधीची तयारी सुरू झाले आहे. शिंदे गटातही एक शिंदे आहे, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी केले. ते माध्यमांशी बोलत होते.
फुटीरांच्या गटात एकनाथ शिंदे : यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे इतके दिवस जे काही सांगत आहेत, ती बाब खरी आहे. महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील. त्याबाबतची तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे. आता या बंडखोरी केलेल्यांमध्ये जी काही लोक आहेत, त्यांच्यामध्येच नाराजी आहे. त्यांच्यातच गट पडले. त्यामुळे तिकडे सुद्धा अस्थिरता आहे. यावर उपाय म्हणजे या निवडणुकांची तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बंडखोर गटात एक एकनाथ शिंदे असतो. असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी (Amol Kirtikar met to Sanjay Raut residence) लगावला.
महाराष्ट्र म्हणून एकत्र या : वेदांत फॉक्सकॉन असेल बल्क ट्रक पार्क असेल, किंवा टाटा एअरबस सारखे अनेक मोठे प्रकल्प ज्यातून कितीतरी लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता असे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले. त्यानंतर आता ऊर्जा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून गेला आहे. यावरून संजय राऊत यांनी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राऊत म्हणाले की, प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर का जात आहेत ? या करता सत्ताधारी विरोधक यांनी एकत्रितपणे बैठक घेतली पाहिजे. त्यांनी लक्षात घ्यायला हवं यातून महाराष्ट्राचे नुकसान होतेय. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील दोघांनीही महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला हवे. या सर्व प्रकल्पांच्या बाबत चर्चा करायला हवी. महाराष्ट्राला देशाच्या नकाशावर नाहीस करण्याचे हे प्रयत्न केले जात आहेत. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले (Sanjay Raut residence) आहे.