मुंबई : तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईमधील कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात छापा घातला होता. त्याबाबत त्यांनी आर्यन खान याला सोडवण्यासाठी शाहरुख खान यांच्याकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप ठेवत सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी सुरू केलीय. आज सुनावणी दरम्यान वकील आबाद फोंडा यांनी बाजू मांडली की, समीर वानखेडे हे अर्थ मंत्रालय भारत सरकारचे नोकर होते. गृह मंत्रालय चौकशीसाठी आदेश देते. तेव्हा असे आदेश कोणत्या नियमाशी सुसंगत आहे? असा प्रश्नही त्यांनी केलाय. समीर वानखेडे हे या प्रकरणापूर्वी 'एनसीबी मुंबई झोन"चे प्रमुख होते. आर्यन खानच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.
आज खटल्यात सुनावणीवेळी सीबीआयकडून मुदतवाढ मागितली गेली. देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता हे सीबीआयची बाजू मांडतील. आम्हाला हस्तक्षेप याचिकाकर्ते आणि समीर वानखेडे यांना 5 सप्टेंबर रोजी बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.- निलेश ओझा
पुढील सुनावणी 5 सप्टेंबर रोजी : सीबीआय वकिल कुलदीप पाटील यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता या खटल्यात बाजू मांडणार आहेत. तेव्हा वेळ आणि मुदतवाढ मिळावी. महाधिवक्ता तुषार मेहता 7 सप्टेंबर रोजी बाजू मांडतील. यासाठी आम्हाला वेळ वाढवून मिळावा. तेव्हा आम्ही सविस्तरपणे आमचे म्हणणे मांडू. सीबीआयने वेळ वाढवून देण्याची मागणी केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 5 सप्टेंबर रोजी निश्चित केली गेली.
सीबीआयकडून एफआयआरमध्ये आरोप : तर या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणारे ॲड. ईश्वर अग्रवाल यांनी याचिकेत मुद्दा मांडलाय की, शाहरुख खानला जोपर्यंत आरोपी बनवत नाही. तोपर्यंत खटला आणि एफआयआर निरुपयोगी आहे. शाहरुख खानने 25 कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप सीबीआयकडून एफआयआरमध्ये झालाय. त्या अनुषंगाने याचिकेमध्ये त्यांनी मोठा खुलासा केलाय. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार लाच देणारा हा गुन्हेगार असतो, लाच देणाऱ्या व्यक्तीविषयी कोणताही गुन्हा नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा :