ETV Bharat / state

"....एवढे पुरावे असताना राऊतांना नेमके काय म्हणायचे कळालेले नाही"

महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. जर कायद्याने पुरावा पाहिजे असेल, तर उदयन राजेंकडे किंवा संभाजी राजेंकडे डॅाक्युमेंट्री आहेत, असे तंजावरचे संभाजीराजे भोसले म्हणाले.

sambhaji-raje-bhosle-comment-on-sanjay-raut-in-mumbai
sambhaji-raje-bhosle-comment-on-sanjay-raut-in-mumbai
author img

By

Published : Jan 16, 2020, 9:29 PM IST

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे म्हटले होते. याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांचे तंजावर येथील १३वे वंशज संभाजीराजे भोसले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. जर कायद्याने पुरावा पाहिजे असेल, तर उदयन राजेंकडे किंवा संभाजी राजेंकडे डॅाक्युमेंट्री आहेत. तसेच साताऱ्यातील राजवाडे, जमिनीवर त्यांचे नाव आहे. हे सगळे पुरावे असताना राऊत यांना नेमके काय म्हणायचे कळालेले नाही, असे म्हणत राऊतांच्या त्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

संभाजीराजे भोसले

Intro:राऊत यांच्या वक्तव्याने तंजावर मधील महाराजांचे वंशजही नाराज

काल संजय राऊत यांनी एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा वंशजांनी द्यावा असं वादग्रस्त वक्तव्य केले त्यावर राज्यभरात पडसाद उमटले आहेत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे मनाला ठेच पोहोचणारे असल्याचे तंजावर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज युवराज राजे भोसले यांनी व्यक्त केली आहे

Body:युवराज राजे भोसले हे तमिळनाडूमधील तंजावर येथील शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ बाबाजी राजे भोसले यांचे भाऊ आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोन पत्नी होत्या. एक जिजामाता आणि दुसरी तुकाबाई .जिजाबाई यांचे सुपुत्र शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पत्नीचे तुकाबाईंचे पुत्र म्हणजे व्यंकोजी महाराज. व्यंकोजी महाराज हे तमिळनाडूमधील तंजावर संस्थान येथे राहिले. यांचे तेरावे वंशज बाबाजीराजे भोसले यांचे भाऊ युवराज राजे भोसले यांनी आज मुंबईत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बातचीत केली

त्यामुळे ते म्हणाले की महाराजांचे वंशज सिद्ध करण्यासाठी संजय राऊत यांनी म्हटले आहे तो मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे पुरावे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील जनता यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर असणारा प्रेम आहे त्याच्या पेक्षा दुसरा कोणता पुरावा नाही देऊ शकत महाराजांच्या वंशजांकडे सर्व कागदपत्रे पुरावे आहेत तसेच जी महाराजांची संपत्ती आहे याच्यावर देखील या वंशजांचे नाव आहेत मग अजून कसले पुरावे हवेत जर त्यांना प्रश्नच असेलच तर ते त्यांनी शोधून काढावे ते इतिहासात देखील त्यांना सापडतील

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले आहे त्याच्यामुळे आमच्या मोठ्या प्रमाणात ठेच लागलेली आहे आणखी पुढे काही बोलण्यासाठी आमच्याकडे नाही असं ईटीव्ही भारतशी बोलताना तमिळनाडूचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज राजे भोसले यांनी सांगितले

Conclusion:यासंबंधित फीड कॅमेरामन सरांनी लाईव्ह झिरो सेवन वरून पाठवलेले आहे युवराज भोसले नावाने पाठवलेले आहे तसेच तमिळ बाईट देखील पाठवलेले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.