मुंबई : आर्यन खान खंडणी प्रकरणात ज्ञानेश्वर सिंग यांनाच 9 लाख रुपये दिल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सॅम डिसुजा याने हा आरोप केला आहे. ज्ञानेश्वर सिंगसह व्ही व्ही सिंग यांनाही पाच लाख रुपये दिल्याचा दावाही सॅम डिसुजाने न्यायालयात केला आहे. सॅम डिसुजा यांच्या या आरोपानंतर आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
खंडणी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आरोप : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. मात्र याप्रकरणात खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी असलेल्या सॅम डिसुझाने उच्च न्यायालयात मोठा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुंबईचे उपमहासंचालक NCB deputy director general ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. 2021 मधल्या एका प्रकरणात सॅम डिसुझाला समन्स आल्यानंतर NCB चे तत्कालीन अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांना 9 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप सॅम डिसुजाने केला. शिवाय अधिकारी व्ही व्ही सिंग यांना 5 लाख देण्यात आल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.
दुपारी होणार सुनावणी : या याचिकेवर न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या द्विसदस्य खंडपिठासमोर दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. ही रक्कम नेमकी कशी पाठवली याचा खुलासा होणार आहे. पैसे पाठवण्यासाठी हवालाचा उपयोग केला आहे, का याचाही खुलासा करण्यात होणार आहे. जर हवालामार्फत पैसे पाठवले तर त्याचा पुरावा काय आहे, याचीही उलट तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
- Satyendar Jain Get Bail : आपचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर, पण दिल्ली सोडून जाता येणार नाही
- Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat : लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरला, 22 जागांवर शिंदे गट लढवणार निवडणूक
- Naxal Girl Passed 12th : जहाल नक्षली ते 12 वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी, जाणून घ्या राजुला हिदामीची संघर्षकथा