मुंबई: 7 वर्षाचा साई बामणे दहा- बाय दहाच्या खोलीचं घर. चेंबूर उपनगरात तो राहतो. संभाजी महाराज व्यायाम शाळेजवळ स्लममध्ये राहणारे कुटुंब आहे. वडील एका खाजगी गारमेंट कंपनीत कामाला आई गृहिणी आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये सर्व दुनियेला वेड लावलं. एका व्यायामाने आणि याच व्यायामाने पण वेड लावलं साईला. त्या व्यायामानेच भारतभर जगभर त्याची दखल घेतली गेली आहे. जाणून घेऊया ह्या साई ह्या बालकाचा अचाट विक्रम.
जोर मारण्याचा इतिहास घडवला कोरोना महामारी आली आणि महामारी संदर्भातले अनेक नवीन शब्द आपल्याला अंगवळणी पडले आहेत. मात्र ह्याच कोरोना महामारीच्या साथीने काही चांगल्या तर काही वाईट सवयी, विचार कृत्य देखील जगासमोर आली. कोरोना काळात लॉकडाऊन घोषित झाले. देश, दुनिया चार भिंतीत कोंडली गेली. ह्या रोगावर औषधे निघतील का, की असच घरातच राहावं लागेल. आपण जगू की मरु या विचारांनी अनेकांना घेरलं होतं. मात्र काही कुटुंबातील व्यक्तीनी आपल्या हमखास विश्वासयोग्य योग, प्राणायाम आहारावर नियंत्रण सुरू केले. अश्याच वातावरणमधून एका विक्रमाची नोंद झाली. साई बामणे ह्या 7 वर्ष वयाच्या मराठी बालकाने पुशप्स अर्थात जोर मारण्याचा इतिहास घडवला आहे.
इंडिया बुक रेकोर्ड झालं India Book of Records हे कसं घडलं तर आता 9 वर्षांचा इयत्ता चौथीमध्ये शिकणारा साई म्हणतो. तेव्हा नाही का. आपल्याकडे कोरोना आला. मग सगळे घरात कोडले गेले. घरात सर्व व्यायाम करायचे .योग करायचे .ते पाहून मी पण करायचो. एकदा गल्लीत मित्र म्हणाला आरे किती जोर मारतो ? तू पहा, आणि मोज. तर मी 100 जोर मारले. दुसऱ्या दिवशी 200 मारले. एकदम नॉन स्टॉप, आणि नंतर एकदम 300 मारले. आणि पपानी मग व्हिडीओ केला. पुढे ते इंडिया बुक रेकोर्ड झालं आहे.
एका मिनिटात 50 जोर यासंदर्भात त्याचे वडील गजानन बामणे यांनी सांगितले की, आम्ही मूळचे सांगोला तालुक्यातले पण वडील मुंबईत होते मी छोट्याशा गारमेंट कंपनीत कामाला आहे. कोरोना काळात हे आपलं लॉकडाऊन लागलं. सगळे घरात कोंडले गेले. मग आम्ही योग प्राणायाम पाहिला. घरात सगळे ते करू लागलो. आणि हा पण करू लागला. मात्र हा कोरोना काळात पण बाहेर इकडे तिकडे खेळायचा फिरायचा दमायचा नाही. आणि गल्लीतले मित्र बोलले की, याने शंभर जोर मारले. आम्हाला खरंच वाटायचं नाही. मग आम्ही त्याला म्हटलं, मार रे बघू तर त्याने एकदम एका मिनिटात 50 जोर मारले. आणि मग आम्हाला वाटलं की, याला काहीतरी खरंच आवड दिसते.
विक्रम करेल याची कल्पना नव्हती आम्ही एका मिनिटांमध्ये त्याने 49 जोर मारतो ते मोजलं. नंतर इंडियाबुक रेकॉर्डला ते पाठवलं आणि त्यांनी दखल घेतली आणि तो अचाट विक्रम ठरला. त्याची आई गृहिणी आहे त्यांचं नाव वर्षा बामणे त्यांनी सांगितलं की, याचं हे असं रोज नियमित व्यायाम करणं, जोर मारणं त्यामुळे आजूबाजूच्यांनी आणि आम्ही देखील त्याला हुरूप दिला. आणि सरते शेवटी त्याने त्यात विक्रम केला. मात्र तो असा विक्रम करेल याची कल्पना नव्हती. मात्र आमची परिस्थिती बिकट आहे. अत्यंत सामान्य आर्थिक गटात आम्ही आहोत आमच्यासारख्याला साधनाची मदतीची प्रशिक्षणाची गरज आहे, ती शासनाने उचलली पाहिजे.
सर्वांनी हुरूप दिला कोरोनाचा काळ आला आणि अनेक दुःखदायक घटना जगासमोर येऊ लागले. त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीवर इलाज शोधणारे संशोधक देखील पुढे आले. त्यासारखीच घटना आव्हानाला सामोरे जाण्याची. ही बाब या मुलाच्या संदर्भात म्हणता येईल. की त्याने त्याला जे गवसलं. आणि घरच्यांनी, गल्लीतल्यांनी त्याला जो हुरूप दिला. त्यातून त्याला आत्मविश्वास मिळाला. आणि त्याने एका मिनिटात 49 जोर मारले आहे.
प्रशिक्षणाची मोफत सोय अखेर इंडिया बुक रेकॉर्ड यांनी त्याची दखल घेतली आहे. एक मराठी बालक कोवळ्या वयात अचाट विक्रम करतो. हे कौतुकास्पद आहेच. मात्र शासनाने केवळ खेळत पदक मिळवलेल्या व्यक्तींचे नाव सांगण्याऐवजी या अशा अत्यंत वंचित कुटुंबातल्या मुलांना भरघोस वार्षिक प्रशिक्षणाची मोफत सोय विविध आहारासाठीची तरतूद चांगल्या प्रशिक्षकाची नेमणूक शासनाने स्वतः करायला पाहिजे, असं या वंचित गटातील पालकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचं सरकार अशा वंचित गटातील बालकाची किती काळजी घेतात येता काळात दिसेल.