ETV Bharat / state

ईडीच्या नोटिसीसाठी माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय -संजय राऊत - पीएनबी बँक घोटाळा

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, संजय राऊत यांनी हे सगळ भाजपाचे राजकारण असल्यची टीका करत, ईडीची नोटीस शोधायला भाजपा कार्यालयात माणूस पाठवला असल्याचा टोला लगावला आहे.

sanjay raut
माझा माणूस भाजप कार्यलयात पाठवलाय - संजय राऊत
author img

By

Published : Dec 28, 2020, 10:53 AM IST

Updated : Dec 28, 2020, 2:24 PM IST

मुंबई- शिवसेनेचे फायर ब्रँड खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)समन्स बजावले आहे. मात्र आम्हाला अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाल्याचे भाजपाकडूनच सांगण्यात येत आहे, त्यामुळे नोटीस शोधायला मी माझा माणूस त्यांच्या कार्यालयात पाठवला आहे, असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएनबी बँकेसंबंधी ईडीची नोटीस आल्याबाबतच्या वृत्तावर संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

माझा माणूस भाजप कार्यलयात पाठवलाय - संजय राऊत
भारतीय जनता पक्ष सांगत आहे. इडीची नोटीस आली आहे. हे सगळं राजकरण आहे, ज्यांना राजकरण करायचे आहे त्यांना करू द्या. अजनुही आमच्याकडे ईडीची नोटीस अजून आलेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माझा माणूस नोटीस शोधायला पाठवला आहे, असे सांगत ईडी नोटीसबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकरणी खासदार संजय राऊत हे 2 वाजता सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय आहे पूर्ण प्रकरण

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (29) रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र ईडीची कोणतीही नोटीस आमच्या पर्यत आली नाही आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 28, 2020, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.