ETV Bharat / state

साध्वीचे आरोप तथ्यहीन; तुरुगांत लैगिंक, मानसिक छळ झालाच नाही - मालेगाव बॉम्ब ब्लास्ट

साध्वी प्रज्ञा सिंग हिला २००८ साली मालेगाव बॉम्ब ब्लास्टप्रकरणी अटक करण्यात आली. २००८ ते २०१७ अशी तब्बल ९ वर्षे साध्वी कारागृहात होती. या दरम्यान, चौकशीत पुरुष पोलिसांकडून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप साध्वीने केला.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
author img

By

Published : Apr 22, 2019, 8:23 PM IST

मुंबई - भोपाळ लोकसभा मतदार संघाची भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग हिने हुतात्मा हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त टिपणी केली. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर तिने पोलीस कस्टडीत असताना लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप केला होता. मात्र, साध्वीने केलेले आरोप मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्य न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. याबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चौकशी समिती अहवालात साध्वीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग हिला २००८ साली मालेगाव बॉम्ब ब्लास्टप्रकरणी अटक करण्यात आली. २००८ ते २०१७ अशी तब्बल ९ वर्षे साध्वी कारागृहात होती. या दरम्यान, चौकशीत पुरुष पोलिसांकडून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप साध्वीने केला. मात्र, साध्वीच्या या आरोपानंतर पोलीस रिमांडसाठी तिला न्यायालयात हजर केले असता तिने न्यायालयाला याची तक्रार केली नाही. पोलीस चौकशी दरम्यान तिच्या वैद्यकीय चाचणीतही मारहाण, लैंगिक किंवा शारीरिक छळ झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नव्हती.

मानवधिकार आयोगाचा अहवालात काय आहे -
शिवसेना हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख पवनकुमार गुप्ता यांनी यासंदर्भात तक्रार दाखल करत साध्वीवर अमानुष अत्याचार पोलीस चौकशीत होत असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रीय मानवाधिकार आयोगाने यासंदर्भात चौकशी समितीची नेमणूक केली होती. त्यानुसार डीआयजी आर.एस. खैरे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला होता.

यामध्ये साध्वीचे कोणताही छळ झाला नसल्याचे सांगितले आहे. ज्यात तुरुंग प्रशासन, तुरुंगातील साध्वी सोबतचे इतर कैदी आणि साध्वीला उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयातील चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून शेवटी २०१५ ला मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला क्लीन चीट दिलेली आहे.

भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील मुख्य आरोपींपैकी एक साध्वी प्रज्ञा सिंग हिने काही दिवसांपूर्वी शाहिद हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त टिपणी केल्याने सर्व स्तरातून या बद्दल टिका झाली. साध्वी प्रज्ञा सिंग हिने तिच्यावर एटीएस पोलीस कस्टडीत  असताना लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप केला होता.मात्र मुळात साध्वी ने केलेले हे सर्व आरोप मुंबई उच्च न्यायालय , सर्वोच्य न्यायालय  या ठिकाणी सिद्ध होऊ शकले नाहीत.  याबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चौकशी समिती अहवालात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. 

काय आहे साध्वीने केलेला आरोप 

साध्वी प्रज्ञा सिंग हिला 2008 साली मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात अटक करण्यात अली होती. 2008 ते 2017 अशी तब्बल 9 वर्षे साध्वी कारागृहात होती . या दरम्यान साध्वीने आरोप केला होता की पोलीस चौकशी दरम्यान पुरुष पोलिसांकडून तिचा मानसिक , शारीरिक छळ करण्यात आला .  मात्र साध्वीच्या या आरोपानंतर पोलीस रिमांड साठी कोर्टात हजर केले असता तिने न्यायालयाला याची तक्रार केली नाही हे ही विशेष म्हणावे लागेल.  पोलीस चौकशी दरम्यान तिच्या वैद्यकीय चाचणीतही मारहाण , लैंगिक किंवा शाररिक छळ झाल्याची  कोणतीही बाब समोर आली नव्हती. 

काय म्हणतय मानवधिकार आयोग 

शिवसेना हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख पवनकुमार गुप्ता यांनी यासंदर्भात तक्रार दाखल करत साध्वीवर अमानुष अत्याचार पोलीस चौकशीत होत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर 2014 मध्ये केंद्रीय मानवाधिकार आयोगानं यासंदर्भात चौकशी समितीची नेमणूक केली होती. त्यानुसार डीआयजी आर.एस. खैरे यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीनं आपला अहवाल सादर केला होता. ज्यात तुरुंग प्रशासन, तुरुंगातील साध्वी सोबतचे इतर  कैदी आणि साध्वीला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयातील  चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर या आरोपांत तथ्य नसल्याचं या समितीनं म्हटलं होतं. याचा परिणाम म्हणून शेवटी  2015 साली  मानवाधिकार आयोगानं याप्रकरणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला क्लीन चीट दिलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.