ETV Bharat / state

खूर्चीसाठी न्यायालयात साध्वीचा आकांडतांडव; म्हणाली त्यापेक्षा मला फासावर लटकवा.. - chair

सुनावणीसाठी मला बोलावले पण बसण्यासाठी योग्य खुर्ची नाही, यापेक्षा हवे तर मला फासावर लटकवा. मेडिकलसाठी कोर्टात अर्ज दिला आहे. सुनावणीसाठी बोलावून मला तीन तास असे उभे करणे योग्य नाही, असे म्हणत साध्वीने आज आपला संताप व्यक्त केला.

खुर्ची न दिल्याने साध्वीला आला राग
author img

By

Published : Jun 7, 2019, 6:42 PM IST

मुंबई - मालेगाव ब्लास्ट संदर्भात आज मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञासिंग सुनावणीसाठी हजर झाली होती. साध्वी गेल्या काही सुनावणीस हजर राहण्यास टाळाटाळ करत होती. मात्र आज साध्वी प्रज्ञासिंग सकाळी साडेअकरा वाजता सुनावणीसाठी विशेष न्यायालयात हजर झाली. या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंगला न्यायालयात बसायला जी खुर्ची देण्यात आली होती. ती बसण्यायोग्य नव्हती तरीही मला ती देण्यात आली, असा दावा साध्वीने वकिलासमोर केला.

खुर्ची न दिल्याने साध्वीला आला राग

मी आजारी आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत, तरीही मला असली खुर्ची देण्यात आली, असे साध्वीचे म्हणणे आहे. जोपर्यंत मी दोषी म्हणून सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला योग्य गोष्टी दिल्याच पाहीजेत, असे साध्वीने म्हटले आहे. सुनावणीसाठी मला बोलावले पण बसण्यासाठी योग्य खुर्ची नाही, यापेक्षा हवे तर मला फासावर लटकवा. मेडिकलसाठी कोर्टात अर्ज दिला आहे. सुनावणीसाठी बोलावून मला तीन तास असे उभे करणे योग्य नाही, असे म्हणत साध्वीने आज आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान साध्वी प्रज्ञासिंगला उच्च न्यायालयाकडून अटी व शर्थीवर साध्वीच्या आजारावर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून साध्वी आजारपणाचे कारण देत न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहत होती. भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवीत साध्वी प्रज्ञा खासदार म्हणून निवडून आली आहे. न्यायालयात आठवड्यातून एकदा न्यायालयात सुनावणीस हजर राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.

Intro:मालेगाव ब्लास्ट संदर्भात आज मुंबईतील विशेष न्यायालयात साध्वी प्रज्ञा सिंग ही सुनावणी साठी हजर झाली मात्र आजच्या सुनावणी नंतर साध्वी प्रज्ञा सिंग चा पारा फारच चढला होता. याच कारण म्हणजे गेल्या काही सुनावणीस हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग आज सकाळी 11. 30 मिनिटांनी विशेष न्यायालयात हजर झाली. मात्र या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग ला कोर्टात बसायला जी खुर्ची देण्यात आली होती ती बसण्या योग्य नव्हती, तरीही मला ती देण्यात आली असा दावा साध्वी ने कोर्टातील वकीलासमोर केलाय.Body:मी आजारी आहे माझ्यावर उपचार सुरू आहेत तरीही मला अशी खुर्ची देण्यात आली अस साध्वी च म्हणणे आहे.
जोपर्यंत मी दोषी म्हणून सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला या गोष्टी दिल्याच पाहीजेत अस साध्वीने म्हटले आहे. सुनावणी साठी मला बोलावलं पण बसण्यासाठी योग्य खुर्ची नाही यापेक्षा हवं तर मला फासावर लटकवा .मेडिकलसाठी कोर्टात अर्ज दिला आहे...सुनावणीसाठी बोलावून मला तीन तास अस उभे करणे योग्य नाही अस म्हणत साध्वीने आज आपला संताप व्यक्त केलाय.Conclusion:दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग ला उच्च न्यायालयाकडून अटी व शर्थीवर साध्वीच्या आजारावर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून साध्वी आजारपणाचे कारण देत न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहत होती. भोपाळ मधून लोकसभा निवडणूक लढवीत साध्वी प्रज्ञा खासदार म्हणून निवडून आली आहे. न्यायालयात आठवड्यातून एकदा न्यायालयात सुनावणीस हजर राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.

( बाईट - रणजित सांगळे , आरोपींचे वकील)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.