मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना डावलून इतरांना संधी देण्यात आल्याने त्याविषयीची नाराजी आणि त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले आहेत. काँग्रेसचे अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेले प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली नाराजी आज प्रकट केली आहे. यासाठी आज त्यांनी आपल्या ट्टवीटर वरून काँग्रेसचे प्रवक्तेपद हटविले असल्याने अनेक राजकीय तर्कविर्तकांना उधाण आले आहे.
दरम्यान, येत्या काळात या नाराजीचे पडसाद म्हणून सावंत हे नवीन राजकीय पर्यायांचा विचार करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच सावंत यांना सेनेकडूनही ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून येत्या काही दिवसांत काँग्रेसला आपला एक अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणारा प्रवक्ता गमवावा लागेल असेही बोलले जात आहे.