ETV Bharat / state

पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देऊन हीन राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न - सचिन सावंत

महाविकास आघाडी सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन ११० लोकांना अटक करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. परंतु, मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त करतात. यावर सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले.

sachin sawant  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत  सचिन सावंत  पालघर हत्याकांड  palghar murder case
पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देऊन हीन राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न - सचिन सावंत
author img

By

Published : Apr 20, 2020, 6:13 PM IST

मुंबई - पालघर जिल्ह्यात जमावाने हल्ला करून तिघांची हत्या करण्याचा प्रकार निंदनीय आहे. पण या दुर्दैवी घटनेला धार्मिक रंग देऊन त्यावरून राजकारण करण्याचा हीन प्रयत्न भाजप करत आहे, अशी संतप्त टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देऊन हीन राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न - सचिन सावंत

पालघरच्या घटनेवरून भाजपने सुरू केलेल्या राजकारणाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना राज्यात वा देशात घडलेल्या अशा अनेक घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे. गतवर्षी पालघर जिल्ह्यात दोन मॉब लिंचींगच्या घटना घडलेल्या आहेत. धुळ्यामध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. पुण्यातही असेच घडले होते. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का दिला नाही? ज्या गावात ही दुर्दैवी घटना घडली ते गाव 'दिवशी गडचिंचले' गट ग्रामपंचायत हा भाजपचा गड असून गेली १० वर्ष तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे आहेत, असेही ते म्हणाले.

चोरांच्या अफवेबरोबर एक अफवा होती, की काही मुस्लीम बांधव पोलिसांच्या/डॉक्टरच्या वेशात येतात. मुले पळवून किडनी काढतात, वा विहिरीत थुंकून कोरोना पसरवतात, अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतंय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केली. याचबरोबर भाजपचे सत्ताकेंद्र तेथील भाजपच्या नेत्यांनी या अफवा पसरू नये म्हणून काय केले? हिंसक जमावाला थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.

महाविकास आघाडी सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन ११० लोकांना अटक करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. परंतु, मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त करतात. यावर सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर वांद्रे येथे स्थलांतरीत मजूर जमा झाल्याच्या घटनेनंतर व आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा वाटतो. सुरतमध्ये जमाव जमल्यावर किंवा भाजपशासित राज्यात मॉब लिचिंग घटना घडल्यावर मात्र अमित शाह यांनी कधी फोन केल्याचे दिसले नाही. यावरून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. कोरोनाचे संकट सर्व देशभर असतानाही भाजप इतक्या हीन पातळीवरती जाऊ शकतो याचे दु:ख वाटते, असे सावंत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.