ETV Bharat / state

'माकड आणि टोपीवाला' या गोष्टीवरून संजय राऊत आणि सचिन सावंत यांच्यात रंगले ट्विटरवॉर - makad

माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांच्यात चांगलेच ट्विटरवॉर झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी माकडं आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचा संदर्भ देत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसची खिल्ली उडवली होती.

संजय राऊत आणि सचिन सावंत यांच्यात ट्विटरवॉर
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:04 AM IST

मुंबई - माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यात चांगलेच ट्विटरवॉर झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी माकडं आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचा संदर्भ देत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसची खिल्ली उडवली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत

टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नसल्याचे म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या सुरू असलेल्या राजीनाम्यावर टीका केली.

  • टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर

    सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकुन दिली.

    याचा काँग्रेस नेत्यांच्या राजिनाम्याशी काही संबंध नाही.

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले सचिन सावंत

संजय राऊतांच्या या टिकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोपीवाला आणि माकड याच गोष्टीचा संदर्भ देत शिवसेनेवर निशाणा साधला. टोपीवाला टोपी खाली टाकीन असे म्हणत राहीला पण टाकेचना! सगळी माकडं आपल्या जवळच्या टोप्या पकडून राहिली. टोप्या टाकायला तयारच होईना! याचा शिवसेना मंत्र्यांच्या खिश्याबाहेर न येणाऱ्या राजीनाम्यांशी काही संबंध नसल्याचे म्हणत सचिन सांवत यांनी संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर दिले.

  • टोपीवाला टोपी खाली टाकीन असे म्हणत राहीला पण टाकेचना!

    सगळी माकडं आपल्या जवळच्या टोप्या पकडून राहीली.
    टोप्या टाकायला तयारच होईना!

    याचा शिवसेना मंत्र्यांच्या खिश्याबाहेर न येणाऱ्या राजीनाम्यांशी काही संबंध नाही. https://t.co/ni3MVxUohO

    — Sachin Sawant (@sachin_inc) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माकड आणि टोपीवाला या गोष्टीचा संदर्भ देत संजय राऊत व सचिन सांवत यांनी ऐकमेकांची चांगलीच खिल्ली उडवली. लोकसभा पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर ज्योतीरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या महासचिव पदाचा तर मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

यावरुनच संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सिवसेनेच्या मंत्र्यांनी आपण राजीनीमे खिशातच घेऊन पिरत असल्याचे सांगितले होते. मात्र, शिवसेना ना सत्तेतून बाहेर पडली, ना कोणी राजीनामा दिला. यावरुनच सचिन सांवत यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.