मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचा त्याग काय कळणार? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशासाठी बलिदान दिलेल्या माजी पंतप्रधानाबद्द्ल वैयक्तिक वल्गना करणे देशाच्या पंतप्रधानाला शोभत नसल्याचेही अहिर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. राजीव गांधी आणि इंदीरा गांधींनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्यावर टीका करणे हे मोदींना शोभत नाही. निवडणुकीच्या माध्यमातून जनता मोदींच्या अहंकाराला उत्तर देईल, असेही अहिर म्हणाले.