ETV Bharat / state

'बिहार निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला', सामनाच्या अग्रलेखातून कौतुक

author img

By

Published : Nov 11, 2020, 11:38 AM IST

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. 'जंगलराजचे युवराज' अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले. बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनात म्हटलं आहे.

सामना
सामना

मुंबई - बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील. बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो, असे शिवसेनेचे मुख्यपत्र सामनात म्हटलं आहे.

टीकेल संयमाने दिले तोंड

तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. 'जंगलराजचे युवराज' अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले. नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागले. पंधरा वर्षे बिहारवर एकछत्री राज्य करणाऱ्या नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली. कारण या तरुण मुलाने निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आणले जे आधी साफ हरवले होते. बिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले, असेही लेखात म्हटलं आहे.

तेजस्वी यांनी एक महागठबंधन बनवले. त्यात काँग्रेससह डावे वगैरे पक्ष आले, पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही. बिहारचे राजकारण हे अनेक वर्षे लालू यादव किंवा नितीशकुमार यांच्याच भोवती फिरत राहिले. हे सत्य असले तरी सध्या लालू यादव तुरुंगात आहेत व गेल्या 15 वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टरवर लालू यादवांचे साधे चित्रही नव्हते. तेजस्वी यादव हाच महागठबंधनचा मुख्य चेहरा होता. तेजस्वीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला व सभेत कमालीचा जिवंतपणा होता. त्यामुळे निकालात तेजस्वीच मुसंडी मारतील हा सगळय़ांचाच अंदाज होता. मतदानानंतर भाजप व जदयुच्या गोटात एक प्रकारे सन्नाटा पसरला होता. लढाई हरत असल्याच्या खात्रीने आलेले हे नैराश्य होते, पण निकालानंतर निराश चेहरे उजळले आहेत, असेही लेखात म्हटलं आहे.

एनडीएला बहुमत

तथापि, बिहारच्या 243 मतदारसंघाच्या झालेल्या या निवडणूकीत एनडीएला बहूमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल एक मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एनडीएने 125 जागा मिळवल्या आहेत. यात भाजपने 74, जनता दल (यु) 43 तर हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर चमकादार कामगिरी केली. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (माले) 12 ,सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहूमतासाठी 124 ही म‌ॅजिक फिगर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.