ETV Bharat / state

मुंबईतून गावी परतण्यासाठी धावपळ, रेल्वे-बस स्थानकावर गर्दी - मुंबईत प्रवाशांची गर्दी न्यूज

मुंबईतील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. त्यामुळे रेल्वे-बस स्थानकावर गर्दी पाहायला मिळत आहे.

mumbai
मुंबई
author img

By

Published : Apr 8, 2021, 3:20 PM IST

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनामुळे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. जागा आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या खासगी बस गाड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी उत्तर भारतातील काही राज्यात जाणाऱ्या बस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.

मुंबई

खासगी गाड्यांच्या तिकिटांचे दरही भडकले

नव्याने लागू झालेल्या कठोर निर्बंधांमुळे परराज्यातील कामगारांनी पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू केला आहे. सध्या रेल्वेमधून मर्यादित प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. आरक्षित जागेव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे आता खासगी बस गाड्यांकडे लोक वळत आहेत. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढवण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे विचारणा होताना दिसत आहे. गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. परिणामी गुजरातमध्ये जाणारे प्रवासी राजस्थानमध्ये जात आहेत. तेथून गुजरातमध्ये जाण्याचा मार्ग निवडत आहेत.

पाच विशेष रेल्वे

एलटीटी रेल्वे स्थानकात जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत आहे. मुंबईतून उत्तर भारतात सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या भरून जाताना दिसत आहेत. दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या ६० ते ७० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी पाच नवीन विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. यामध्ये मुंबई-गोरखपूर स्पेशल, पुणे-दानापूर, मुंबई-पटना, मुंबई-गोरखपूर विशेष, मुंबई-दरभंगा अतिजलद विशेष या पाच गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरोनानंतर कमी केलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यासाठी दर महिन्याला रेल्वेकडून काही नवीन गाड्या सुरू केल्या जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - संभाजी भिडेंचे कोरोनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य - जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील

हेही वाचा - लसीकरण करा आणि मिळवा पाच लाखांचे पारितोषिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.