ETV Bharat / state

Kalgitura Rural Drama : मुंबईत रंगणार ग्रामीण नाटकाचा कलगीतुरा 'एनसीपीए'चे आयोजन - नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स

भारतीय कलावर्तुळात सन्मानाचे स्थान असलेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई (NCPA) या संस्थेने २०२२-२३ या वर्षासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या 'दर्पण' या मराठी नाट्यलेखन उपक्रमातील विजेत्या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित 'कलगीतुरा' या प्रायोगिक नाटकाचे प्रयोग ऑगस्टपासून धडाक्यात सुरू होत आहेत. (Kalgitura Rural Drama)

rural drama
ग्रामीण नाटकाचा 'कलगीतुरा'
author img

By

Published : Aug 1, 2023, 3:16 PM IST

मुंबई : कलगी म्हणजे शक्ती, तुरा म्हणजे शिव. म्हणजेच कलगीतुरा. शाहिरी गायनातून होणारा हा अनोखा झगडा ही गावची प्रबोधनात्मक करमणूक असायची. शिवाय गावातील एखाद्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास रात्रभर त्याकुटुंबाच्या सोबतीला राहणारे, तिथे बसून कलगीतुरा गाणारे त्या दुःखाला राखायला जायचे. पण जसजसे जीवन सुखकर व समृद्ध होऊ लागले तेव्हा जुन्या प्रथा-परंपरा बदलल्या. परिणामी खेड्यातील कलगीतुरा अस्तंगत झाला. परंतु कलात्मक मूल्य असलेल्या नव्या तरुणांनी ही लोप पावलेली परंपरा पुनरूज्जिवित केली.

गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक यासारखी एकाहून एक सरस नाटके मराठी प्रायोगिक रंगभूमीला देणाऱ्या दत्ता पाटील व सचिन शिंदे या जोडीचे कलगीतुरा हे नवे नाटकही रंगभूमी गाजवते आहे, त्यांना स्वप्नील शेलार यांच्या मोहक संगीताची साथ लाभली आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे म्हणाले की, आम्ही या पारंपरिक कलाप्रकारावर सखोल संशोधन करून एक साधे, पण प्रभावी सादरीकरण करावे, हाच 'कलगीतुरा' करण्यामागे आमचा उद्देश होता. 'कलगीतुरा' सादर करताना रसिकांना काल्पनिक नाट्यानुभव देण्यापेक्षा त्यांना वास्तवतेच्या जवळ घेऊन जाण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.

एनसीपीएच्या वतीने 'कलगीतुरा'ची निर्मिती करणाऱ्या राजश्री शिंदे म्हणाल्या की, जसजसे आपले जीवन विकसित होत आहे तसतसे मानवतेची मूलभूत मूल्ये अबाधित राहिली पाहिजेत. 'कलगीतुरा' सादर करणारे लोककलावंतही या परंपरेतून आपल्या सांस्कृतिक वारशाची परंपरा जोपासत आले आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपल्या लोकपरंपरा आणि कला लोकांपर्यंत पोहोचवणे हे एनसीपीएसाठी खूप महत्वाचे आहे.

५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, ६ ऑगस्टला एनसीपीए, २० ऑगस्टला नाशिकच्या कालिदास कलामंदिरात तर २७ ऑगस्टला मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात कलगीतुराचे प्रयोग होत आहेत, अशी माहिती एनसीपीएचे चित्रपट व नाट्यविभाग प्रमुख ब्रूस गुथ्री व कार्यक्रम विभागाच्या सहव्यवस्थापक तथा कलगीतुराच्या निर्मात्या राजेश्री शिंदे यांनी दिली आहे. मराठीत सादर होणारं नाटक 'कलगीतुरा' एनसीपीएमध्ये अमराठी प्रेक्षकांना इंग्रजी सबटायटल्ससह पाहता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.