ETV Bharat / state

वडाळा; मनसेकडून पेट्रोलवर १५ रुपयांची सूट - MNS anniversary

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा, असे म्हटले आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघातील मतदार वाहनचालकांना पक्षाच्या १५व्या वर्धपान दिनानिमित्त प्रति लिटर १५रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसेकडून पेट्रोलवर १५ रुपयांची सूट
मनसेकडून पेट्रोलवर १५ रुपयांची सूट
author img

By

Published : Mar 9, 2021, 3:35 PM IST

Updated : Mar 9, 2021, 4:59 PM IST

मुंबई- मनसेचा आज १५ वा वर्धापण दिन आहे. मात्र, कोरोनामुळे हा वर्धापण दिन साजरा होत नसला तरी कार्यकर्ते आपल्यापद्धतीने हा वर्धापण दिन साजरा करत करत आहेत. वडाळा विधानसभा क्षेत्रात मनसेच्यावतीने १० पेट्रोल पंपावर प्रतिलिटर पेट्रोल मागे १५ रुपयांची सूट दिली जात आहे.

मनसेकडून पेट्रोलवर १५ रुपयांची सूट

वडाळ्यात मिळणार पंधरा रुपये पेट्रोलमध्ये सूट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धपान दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अर्थसंकल्पात राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी तरतूद करेल असे वाटले होते. मात्र, सरकारने सर्वसामान्यांसाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यानुसार वडाळा विधानसभा मतदारसंघातील मतदार वाहनचालकांना पक्षाच्या १५व्या वर्धपान दिनानिमित्त प्रति लिटर १५ रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विभागामध्ये रविवारपासून टोकन देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वडाळा विधानसभा क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांची यादी या टोकनसोबत नागरिकांना देण्यात येत असल्याची माहिती मनसेचे वडाळा विधानसभा अध्यक्ष आनंद प्रभू यांनी दिली.

Last Updated : Mar 9, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.