ETV Bharat / state

'गाऊन' घालून चोरी करणारा आरोपी गजाआड, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त - गणेश गुरव

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमध्ये एक महिला मॅक्सी घालून चोरी करीत असल्याचे समोर आले होते.

महिलांचा गाऊन घालुन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

author img

By

Published : Jan 16, 2020, 4:31 PM IST

Updated : Jan 16, 2020, 4:56 PM IST

मुंबई - चोरी करणारा गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी गुन्हा करताना तो कुठली ना कुठली चूक करतोच. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमध्ये गेल्या वर्षभरापासून मॅक्सी घालून चोरी करत असणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश गुरव (45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

'गाऊन' घालून चोरी करणारा आरोपी अखेर अटकेत

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमध्ये वर्षभरापासून वारंवार चोर्‍या होत होत्या. या परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेस घरफोड्या वाढल्या असताना एक महिला मॅक्सी घालून करीत असल्याचे समोर आले होते. परिसरातील दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावून सुद्धा ही महिला चोर पकडली जात नव्हती. मात्र, मॅक्सीतील आरोपी ही महिला नसून पुरुष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने १४ चोऱ्या केल्या असून शेवटी तो पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे.

हेही वाचा - "इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"

गणेश गुरव या आरोपीवर खून व अनधिकृत शस्त्र बाळगण्याचा गुन्हा याअगोदर दाखल आहे. पोलीस रेकॉर्डवर नामचीन असल्या कारणाने चोऱ्या करण्यासाठी या आरोपीने पोलिसांकडून पकडले जाऊ नये, म्हणून चक्क लेडीज मॅक्सी घालून चोऱ्या करण्यास सुरुवात केली होती. अंगकाठी बारीक असल्याकारणाने सुरुवातीला पोलिसांनी आरोपी महिला असल्याचे समजून तपास सुरू केला होता. परिसरात नाकाबंदी करूनही चोर सापडत नसल्याने शेवटी सीसीटीव्ही पुन्हा तपासण्यात आल्या. मात्र, दुकानात शिरून चोरी करणाऱ्या आरोपीचा पेहराव महिलेचा जरी असला तरी चालणे पुरुषी असल्याने पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली.

हेही वाचा - 'तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी तंगड्या सर्वांनाच असतात हे लक्षात ठेवा'

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गणेश गुरव या आरोपीला अटक करत तब्बल २५ लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:कानून के हात लंबे होते है हा चित्रपटातील डायलॉग प्रत्यक्षात खरा असल्याचे समोर आले आहे. गुन्हा करणारा गुन्हेगार कितीही चलाख असला तरी गुन्हा करताना तो कुठली ना कुठली चूक करतोच. याच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर मध्ये गेेल्या वर्षभरापासून वारंवार चोर्‍या होत होत्या.या परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेस घरफोड्या वाढल्या असताना ही चोरी एक महिला मॅक्सी घालुन करीत असल्याचे समोर आले होते. परिसरातील दुकानांमध्ये सीसीटीवी लावून सुद्धा ही महिला चोर पकडली जात नव्हती मात्र पोलिसांच्या नजरेस अशी एक गोष्ट आली ज्यामुळे मॅक्सीतील आरोपी ही महिला नसून पुरुष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या चोराला 14 गुन्हे केल्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Body:पोलिसांनी या प्रकरणी गणेश गुरव(45) या आरोपीला अटक केली असून ठाण्यात राहणाऱ्या या आरोपीवर खून व अनधिकृत शस्त्र बाळगण्याचा गुन्हा या आगोदर दाखल आहे. पोलीस रेकॉर्ड वर नामचीन असल्याकारणाने चोऱ्या करण्यासाठी या आरोपीने पोलिसांकडून पकडले जाऊ नये म्हणून चक्क लेडीज मॅक्सी घालून चोऱ्या करण्यास सुरवात केली होती. अंगकाठी बारीक असल्याकारणाने सुरवातीला पोलिसांनी आरोपी महिला असल्याचे समजून तपास सुरू केला होता. परिसरात नाकाबंदी करूनही चोर सापडत नसल्याने शेवटी सीसीटीवी पुन्हा खंगाळण्यात आले होते. मात्र दुकानात शिरून चोरी करणारा आरोपिचा पेहराव महिलेचा जरी असला तरी चालणे पुरुषी असल्याने पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली .

Conclusion:खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गणेश गुरव या आरोपीला अटक करीत तब्बल 25 लाखांचा चोरी केलेला ऐवज जप्त केला आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करीत आहेत.

( बाईट-डॉ. मोहन दहिकर , डीसीपी )
( रेडी टू एअर पॅकेज जोडले आहे.)
Last Updated : Jan 16, 2020, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.