ETV Bharat / state

'बेस्ट'मध्ये गर्दी झाल्यास प्रवाशांना खाली उतरवण्याचा चालक-वाहकाला अधिकार

जादा फेऱ्या असूनही प्रवासी, बसमध्ये शेजारी बसून, गर्दीत उभे राहून प्रवास करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवासी नियम पाळत नाहीत. त्यामुळेच असे टोकाचे पाऊल प्रशासनाने उचलायचे ठरवले आहे. परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्याकरिता जवळच्या आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

right to get passengers off the best bus due to coronavirus
'बेस्ट'मध्ये गर्दी झाल्यास प्रवाशांना खाली उतरवण्याचा चालक-वाहकाला अधिकार
author img

By

Published : Apr 17, 2020, 10:24 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी व बेस्ट बसमार्फत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, बेस्ट बसमध्ये बसताना गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत वारंवार सांगूनही प्रवासी ऐकत नाहीत. अशा प्रवाशांना खाली उतरवण्याचा अधिकार चालक आणि वाहकांना बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

right to get passengers off the best bus due to coronavirus
बससाठी रांग

जादा फेऱ्या असूनही प्रवासी, बसमध्ये शेजारी बसून, गर्दीत उभे राहून प्रवास करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवासी नियम पाळत नाहीत. त्यामुळेच असे टोकाचे पाऊल उचलायचे प्रशासनाने ठरवले आहे. गंभीर परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्याकरिता जवळच्या आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पालिका कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलीस इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबईअंतर्गतच नव्हे तर उपनगरातील ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, वसई, विरार येथूनही मुंबईसाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या सुरू आहेत. दररोज १,२०० ते १,३०० बस फेऱ्या बेस्ट करत आहे. त्यासाठी सुमारे ३ हजार चालक-वाहक कार्यरत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.