मुंबई: काँग्रेस मंत्र्यांच्या कामाबाबतचा अहवाल दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्वच मंत्री हजर राहणार आहेत. संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. पार पडेल. यासोबतच महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्ष उलटून गेली तरी अद्यापही महामंडळांचे वाटप झालेले नाही. खातेवाटप बाबत काँग्रेसकडून एकमत होत नसल्याने अद्याप महामंडळाचे वाटप झाले नसल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अद्याप राहुल गांधी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नसली तरी, एप्रिल महिन्याच्या शेवटी हा दौरा असेल अशी शक्यता काही काँग्रेस मंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याचे नियोजना बाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
Meeting of Congress Ministers : काँग्रेस मंत्र्यांची आज आढावा बैठक, कामकाजा घेतला जाणार आढावा! - Mahavikas Aghadi government
महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज बैठक (Meeting of Congress Ministers) असून या बैठकीतून काँग्रेस मंत्र्यांच्या कामाचा आढावा (work will be reviewed) घेतला जाणार आहे. काँग्रेसकडे असलेल्या खात्याच्या मंत्र्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार असून, याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे