ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉमच्या पाचव्या सत्राचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने बीकॉमच्या सत्र 5व्या सत्राचे निकाल जाहीर केले आहेत. यानुसार 95.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Mar 2, 2021, 8:19 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाने बीकॉम तृतीय वर्ष सत्र 5 या परीक्षेचा निकाल आज (दि. 2) जाहीर केले आहे. या परीक्षेचा निकाल 95.19 टक्के लागलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीकॉम सत्र 5 च्या अभ्यासक्रमाचे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली होती.

63 हजार 532 विद्यार्थी उत्तीर्ण

डिसेंबर 2020 मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय बीकॉम सत्र 5 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेचा निकाल 95.19 टक्के लागलेला आहे. या परीक्षेत एकूण 63 हजार 532 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 69 हजार 420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 68 हजार 958 एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर 462 विद्यार्थी गैरहजर होते. तर 3 हजार 212 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

आतापर्यंत 95 परीक्षेचे निकाल जाहिर

कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातसह राज्यभरात लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा 2020 मध्ये लांबणीवर पडला होत्या. आज मुंबई विद्यापीठाने तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केलेले आहे. तर सोमवारी (ता. 1) तृतीय वर्ष बीए सत्र 5 बरोबर, तृतीय वर्ष बीए 5 (7 ग्रेट पॉईंट), एमए समाजशास्त्र सत्र 3 आणि बीई इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग सत्र 7 च्या निकालाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने 95 अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले आहे.

हेही वाचा - विनामास्क कारवाईनंतर रेल्वे प्रवाशांना लागली शिस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.