ETV Bharat / state

Mumbai University Result: विधी विषयाची परीक्षा होऊन 2 महिने झाले निकाल नाही; मुंबई विद्यापीठातील हजारो विद्यार्थी प्रतीक्षेत - Mumbai University

मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि मुंबई विद्यापीठातील सर्व विधी महाविद्यालयातील विधी विषयाच्या परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आल्या. मात्र निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी निकालाच्या परीक्षेत आहे.

Mumbai University result
विधी विषयाचा निकाल
author img

By

Published : Mar 6, 2023, 9:30 AM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाने डिसेंम्बर 2023 या महिन्यात संलग्न सर्व महाविद्यालयातील विधी विषयाच्या परीक्षा घेतल्या. विधी विषयाच्या प्रत्येक वर्ष आणि अंतिम वर्षाच्या या परीक्षा होत्या. त्यामध्ये पाचव्या वर्षाच्या विधी विषयासाठी सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र मार्च महिना उजाडला आणि निकाल नाही. त्यामुळे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी निकाल केव्हा लागणार? याच्या विवंचनेमध्ये आहे.

विधी विषयाच्या परीक्षांचे निकाल : विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा संपते, त्या दिनांकापासून पुढील 30 दिवसापर्यंत विद्यापीठाने विधी विषयाच्या परीक्षांचे निकाल घोषित केले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील आपल्या शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. त्यामुळे त्यांना त्या प्रवेशाचे नियोजन करता येईल. हे त्यामध्ये गृहीत असते. विद्यार्थी संघटनांच्या दाव्यानुसार, परंतु अद्यापही परीक्षा होऊन 30 दिवसापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. निकाल जाहीर न झाल्याने हजारो विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत.

विद्यापीठाचा निकाल उशिरा लागण्याचे कारण : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा झाली. त्यानंतर तीस दिवस होऊन फेब्रुवारी महिना उजाडला, त्यानंतर आता मार्च देखील उजाडला. मात्र मुंबई विद्यापीठाने अजूनही निकाल जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली ओएसएम प्रणाली आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता यामुळे एमयू कायद्याच्या निकालांना विलंब झाला. महाराष्ट्र स्टुडंट युनियन यांचे नेते सिद्धार्थ इंगळे, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन म्हणाले, गेल्या पाच वर्षात मुंबई विद्यापीठाच्या विधी विषयाचे निकाल 2017 मध्ये आउटसोर्स केलेल्या ओएसएम प्रणालीमुळे उशिराने लागत आहेत. बॅकएंड ऑफिसला हजारो पानांच्या उत्तरपत्रिका स्कॅन कराव्या लागतात. नंतर त्या दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन विधी महाविद्यालयांमध्ये पाठवाव्या लागतील. यात मोठा काळ लागतो.

विद्यापीठांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला : यासंदर्भात विद्यार्थी नेते विकास शिंदे यांनी देखील मत मांडले की, लवकर आणि वेळेत निकाल लावण्यासाठी काही उपाययोजना मुंबई विद्यापीठाने केल्या पाहिजे. 7 नोव्हेंबरला परीक्षा सुरू झाल्या आणि 60 डिसेंबरला परीक्षा संपल्या परीक्षा संपल्यानंतर 80 दिवस झाले तरी निकाल लागलेला नाही. निकाल लागलेला नाही, याचे कारण म्हणजे विद्यापीठाच्या आधी नियमानुसार परीक्षा संपली त्याच्यानंतर 30 ते 45 दिवसात निकाल लागला पाहिजे पण ते झालेले नाही हे मूळ कारण आहे. ते झाले असते, तर पुढील शैक्षणिक नियोजन विद्यार्थ्यांना करणे सोपे गेले असते. गेल्या पाच वर्षापासून परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत आऊट सोर्सिंगमुळे विद्यापीठांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. विद्यापीठाने ताबडतोब त्याच्यावर उपाय केला पाहिजे.

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कधी संपणार : तर छात्र भारतीचे विद्यार्थी नेता रोहित ढोले याने म्हटलेले आहे की, गेल्या चार-पाच वर्षांपासून या विद्यापीठाच्या अशा धोरणामुळे विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पदरी पडत नाहीत. पुढील शैक्षणिक नियोजन करताना मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेकांना पुढील शिक्षण घेता येत नाही, कारण पुढचे अनेक प्रवेश त्यामुळे रखडले जातात. कोरोनानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेचे पूर्ण पैसे परीक्षेची फी, अभ्यासक्रमाची फी या सर्व गोष्टी कठीण परिस्थितीमध्ये पूर्ण कराव्या लागलेल्या आहेत. 80 दिवसापेक्षा अधिक काळ लोटला आणि परीक्षेचा निकाल लागला नाही. त्यामुळे भरलेले पैसे वाया जाईल, वेळेत जर निकाल लागला तर पुढील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेता येईल. आपल्या नोकरी किंवा उद्योगासंदर्भात निर्णय घेता येईल. त्यामुळेच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कधी संपणार? हा प्रश्न उपस्थित होतो. विद्यापीठाची या संदर्भातील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विनोद मळाळे यांच्याकडे संपर्क साधला असता ते व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडून याबाबत प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

हेही वाचा : Rahul Gandhi in London : देशात भाजपविरोधी वातावरण, 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू - राहुल गांधी

प्रतिक्रिया देताना विद्यार्थी नेते विकास शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.