राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मात्र, कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अंबाबाई मंदिरमध्ये कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकाही भक्ताला किंव्हा मंदिरातील कर्मचारी तसेच पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.
LIVE UPDATE : महाराष्ट्रात वाढता कोरोना, अनेक जिल्ह्यांत संचारबंदी - महाराष्ट्र लॉकडाऊन
18:29 February 22
अंबाबाई मंदिरात कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन
18:24 February 22
कोरोनाच्या सावटाखाली दहावी-बारावीच्या परीक्षा!
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा होतील असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षाबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नसल्याचे खुद्द शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.एवढेच नाही तर राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी सावध भूमिकाही गायकवाड यांनी घेतली आहे.
17:20 February 22
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर हिंगोली नगरपालिकेची दंडात्मक कारवाई
हिंगोलीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे हिंगोली प्रशासन आता सज्ज झाले असून, रुग्ण आढळलेला भाग सील करण्यासाठी सुरुवात केली आहे. विना मास्क फिरणाऱ्याना दंड लावला जात आहे. आतापर्यंत 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
17:15 February 22
23 फेब्रुवारीपासून तर एक मार्चपर्यंत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
अकोला - जिल्ह्यात एक दिवसांच्या संचारबंदी नंतर ते 23 फेब्रुवारीपासून तर एक मार्चपर्यंत संचारबंदीच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारांमध्ये आज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.
16:25 February 22
पिंपरी -चिंचवडमध्ये कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचे आदेश
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बंद करण्यात आलेली कोविड रुग्णालये पुन्हा सुरु करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
16:21 February 22
येवला :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येवला शहरात कोरोना बाबतचे नियम व अटी न पाळणार्याविरोधात दंडात्मक धडक कारवाईला सुरुवात झाली आहे.
येवल्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात कोरोनाबाबतचे नियम व अटी न पाळणार्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे.
16:17 February 22
पैठण येथील संत एकनाथ मंदिर पूर्णतः खुले न ठेवण्याच्या सूचना
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मध्यंतरी करोना रुग्णामध्ये घट झाल्याने राज्य शासनाने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, लोक कोरोना नियम पाडदळी तुडवत मंदिरांमध्ये गर्दी करताना दिसत आहे. परिणामी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण येथील संत एकनाथांचे मंदिर पुर्णपणे खुले न ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
15:56 February 22
अमरावतीत सात दिवसांचे लॉकडाऊन
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
15:50 February 22
कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यात कोविडसेंटर उभारणार आहेत.
कोल्हापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुन्हा कोविडसेंटर उभे करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. तसेच कोविड सेवेत काम करणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांना शुक्रवारपर्यंत कोरोना लस घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
अंबाबाई मंदिर बाबत अद्याप कोणताही निर्णय नाही -
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मात्र, कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलाले नाही आहे..
14:53 February 22
जळगाव बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाही
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, असे असताना जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असून, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. या विषयासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने दिलेल्या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. बाजार समितीत यापुढे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाकारण्यात येणार असून, फक्त घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.
14:40 February 22
मुंबईत लॉकडाऊनचा पालकमंत्र्यांचा इशारा
राज्याच्या अनेक भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईतही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात मुंबई अडकली तर त्यातून बाहेर निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनीही नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जर मुंबईकरांनी नियम पळाले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री यांनी दिला आहे.
13:43 February 22
पंढरपूरातील विठ्ठल मंदिर २ दिवसांसाठी बंद

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा माघी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद असणार आहे. उद्या(२३ फेब्रुवारी)ला एकादशीच्या दिवशी पंढरपुरात संचारबंदी असणार आहे. पोलीस प्रशासनाने पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. फक्त एसटी बस सेवा सुरू राहणार आहे.
13:23 February 22
नागपुरात ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमावलीला पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून आता कठोर पावले उचलायला सुरूवात झाली आहे.
राज्याच्या उपराजधानीत ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. नववी आणि दहावी या वर्गांच्या परीक्षा घेणे गरजेचे असल्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. खासगी शिकवणी वर्गांमध्येही कडक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.
पुण्यात रात्रीची संचारबंदी
पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिलह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत . रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.