ETV Bharat / state

पर्यटकांसाठी खुशखबर; सीएसएमटी स्थानकातील 'रेस्टॉरंट ऑन व्हील' खुले!

author img

By

Published : Oct 19, 2021, 2:17 AM IST

कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नवनव्या संकल्पना (इनोव्हेटिव्ह आयडियाज) अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्सची आजपासून सुरुवात केली आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले आहे. या रेस्टॉरंट ऑन व्हील्स” एक उत्तम जेवणाचे ठिकाण असेल जे जेवणाऱ्यांना एक अनोखा अनुभव प्रवाशांना देणार आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची साेय आहे. यातून दरवर्षी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची रेल्वेला आशा आहे.

restaurant on wheel start in csmt railway station mumbai
सीएसएमटी स्थानकातील 'रेस्टॉरंट ऑन व्हील' खुले!

मुंबई - मध्य रेल्वेकडून नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर हे प्रवाशांना आणि पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी एक वेगळा रेस्टॉरंट सुरू केलेले आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खादयपदार्थांची चव चाखता येणार आहे. रेस्टॉरंट ऑन व्हीलची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे.

अशी मिळणार सुविधा -

कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नवनव्या संकल्पना (इनोव्हेटिव्ह आयडियाज) अंतर्गत मध्य रेल्वेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्सची आजपासून सुरुवात केली आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार केले आहे. या रेस्टॉरंट ऑन व्हील्स” एक उत्तम जेवणाचे ठिकाण असेल जे जेवणाऱ्यांना एक अनोखा अनुभव प्रवाशांना देणार आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची साेय आहे. यातून दरवर्षी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची रेल्वेला आशा आहे. येथे प्रवासी,पर्यटकांना व्हेज आणि नान व्हेज दाेन्हीचा आस्वाद घेता येणार आहे. मध्यप्रदेश रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनेही रेल कोच रेस्टॉरंट सुविधा सुरू केली. आसनसोल विभागातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबवली आहे. दाेन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अशी आली संकल्पना -

सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्टॉल्स असले तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे रेस्टॉरंट नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेते. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील' ही संकल्पना सुरू राबविली. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत सीएसएमटी स्थानकात त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. वापरात नसलेल्या एका जुन्या रेल्वे डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिले. भारतीय रेल्वे या थीमवर डब्याच्या आतील भागातील रंगकाम, सजावट करण्यात आली आहे.

हेही वाचा - Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी 'गोड' बातमी.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार

या स्थानकात हाेणार रेस्टॉरंट ऑन व्हील -

सीएसएमटी स्थानकांनतर आता एलटीटी, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी सह पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा टर्मिनस, बाेरीवली आणि सुरत स्थानकातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार या स्थानकात जुन्या काेचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात येणार आहे.तसेच मुंबई दर्शनाकरिता येणाऱ्या पर्यटकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर, आकुर्डी, बारामती, चिचवाड आणि मिरज स्थानकात निविदा काढण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.