ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिन २०२१ : हुतात्मांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं अभिवादन - प्रजासत्ताक दिन २०२१ न्यूज

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्मांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले.

republic day 2021 : DCM ajit pawar pays tributes to martyrs
प्रजासत्ताक दिन २०२१ : हुतात्मांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं अभिवादन
author img

By

Published : Jan 26, 2021, 10:26 AM IST

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्मांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले. राज्यातील जनतेला तसेच देशवासियांना ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील पवार यांनी दिल्या.

आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हाने होती. परंतु गेली ७२ वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवले, वाढवले, सुरक्षित केले. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षीत राहिली, याचे श्रेय देशातील जनतेला आणि जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर, भारतीय राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदकांनी सन्मानित झालेल्या राज्याचे पोलीस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या राज्यातील बालकांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ वर्षांच्या वाटचालीत देश घडविण्यासाठी योगदान दिलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Padma Awards २०२१ : महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान

हेही वाचा - निर्बीजीकरणानंतरही मुंबईतील श्वानांची संख्या वाढली; पालिका पुन्हा करणार १३ कोटी रुपयांचा खर्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.