ETV Bharat / state

MLA Raees Shaikh : कॅगद्वारे चौकशी करताना मुंबईच्या पालिका आयुक्तांना पदावरून हटवा - आमदार रईस शेख - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना पदावरून (Remove municipal commissioner during inquiry by CAG) हटवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील माजी गटनेते रईस शेख (Demanded MLA Raees Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

MLA Raees Shaikh
आमदार रईस शेख
author img

By

Published : Nov 1, 2022, 7:28 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची चौकशी कॅगमार्फत केली जाणार आहे. पालिका आयुक्तांना खर्चाचे अधिकार दिलेल्या काळातील ही चौकशी आहे. अशी चौकशी करताना संबंधित अधिकारी त्याच पदावर कार्यरत असणे शासनाच्या नियमावलीनुसार योग्य नाही. यासाठी पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना पदावरून (Remove municipal commissioner during inquiry by CAG) हटवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व पालिकेतील माजी गटनेते रईस शेख (Demanded MLA Raees Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

रईस शेख यांनी केले स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात, मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची कॅग द्वारे चौकशी करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. या निर्णयाचे शेख यांनी स्वागत केले आहे. याबाबत वारंवार राज्य सरकार, पालिका आयुक्त यांच्याकडे आपणही लेखी तक्रार केली होती, असे शेख यांनी म्हटले आहे. पालिकेमार्फत निशल्प रियल्टीज यांच्याकडून दहिसर येथील जमीन व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करून त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.

MLA Raees Shaikh
MLA Raees Shaikh

आयुक्तांना पदावरून हटवा : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने १७ मार्च २०२० रोजी आयुक्तांकडे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. याबाबत स्थायी समितीमार्फत ठराव देखील पारित करण्यात आला होता. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामधील विकास कामांची कॅग मार्फत चौकशी सुरू होणार आहे. तेच अधिकारी सद्यस्थितीत त्याच पदावर कार्यरत असणे शासनाच्या नियमावलीनुसार योग्य नाही. सदर चौकशीमध्ये प्रशासकीय अधिकारी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना पदावरून हटवून योग्य चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.