मुंबई: Uday Lalit: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज सत्कार करण्यात आला. आमच्या घरात मराठमोळं वातावरण असून आजी सोडली, तर आजवर कायम काळा कोट घालत असल्याचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगत आठवणींना उजाळा दिला. राजभवनात सत्कार झाल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. Relive memories by Uday Lalit
सरन्यायाधीश उदय लळीत याची आठवण महाराष्ट्र राज्याचा सुपुत्र त्यामुळे माझं शिक्षण राज्यात झाले. या राज्याने मला खूप काही दिले आहे. आज या राज्याचा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पाहता यावा, त्याची ओळख व्हावी, म्हणून मी मोटारसायकलवर माझ्या मित्रासोबत राज्य फिरून झाले आहे. आज माझ्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. ते दिल्लीत मोठे झाले आहेत. पण घरात मराठमोळं वातावरण आहे. माझी आजी सोलापुरात पहिली डॉक्टर, पण त्यांनतर आमच्या घरी कुणी पांढरा कोट घातला नाही. कायम काळा कोट घातल असल्याची आठवण लळीत यांनी सांगितली. तसेच 4 दिवसांनंतर मी निवृत्त होणार आहे, अशी खंतही व्यक्त केली. आजवर केलेल्या प्रसंगाची आठवणींना उजाळा दिला. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्याची अनेक कामे माझ्याकडे होती. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा राजभवनात येणार असल्याचे लळीत म्हणाले.
तुम्ही राजभवनात लवकरच येणार- राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले. एकनाथ शिंदे यांना पण ते मिळाले. पण, दुसऱ्या शिंदेंना मिळाले नाही, असा चिमटा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी Governor Bhagat Singh Koshyari सुशीलकुमार शिंदे यांना काढला आहे. गेल्या 3 वर्षात राज्यातील अनेक लोक मोठ्या पदावर बघितले. दोन सर न्यायाधीश बघितले. आता तिसरेही बघणार असल्याचे कोश्यारी म्हणाले. तसेच लळीत मराठीत बोलत असताना, तुळजाभवानीचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली. मला मराठी बोलता येत नाही. मात्र कोण काय बोलते हे समजतं असल्याचे कोश्यारींनी सांगितले. निवृत्त होणाऱ्या लळीत यांनी लवकरच राजभवनात यावे, असे विधान केले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, कॉलेज आणि संघात असताना, मित्र मला म्हणायचे काय राष्ट्र, राष्ट्र करतो, इथे राष्ट्र कुठे आहे, हा महाराष्ट्र सौराष्ट्र आहे. त्यावर गोळवलकर गुरुजींनी दिलेले उत्तर मी सांगितले. इथे माणसात ही राष्ट्र आहे. ते म्हणजे धृतराष्ट्र असल्याचा टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.
लळीत यांनी कायम पारदर्शकतेचा स्वीकार केला- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान झाले आहे, याचा आनंद आहे. अनेक सामाजिक सुधारणा राज्यात झाल्या असून अनेक कायदेपंडित ही राज्याची ओळख आहे. लळीत कुटुंबीयांनी हा मान कायम ठेवला आहे. देशाचे लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक, पद्मनाभ मंदिर यात निकाल दिले आहेत. लळीत यांनी कमी वेळात प्रकरण निकाली काढली. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच लळीत यांनी कायम पारदर्शक पद्धतीचा स्वीकार केल्याचे ते म्हणाले. दरम्यान कोर्टाचे काम सध्या आपण लाईव्ह पाहू शकतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. विनम्रता, शालीनता हा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे. आम्ही कोर्टाच्या सूचनांचे पालन करतो. लळीत लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण पान लिहितील, असा आशावाद व्यक्त करत लळीत यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.