ETV Bharat / state

Regular Salary Of ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनाची हमी, एसटी आजारीच - Regular Salary Of ST Employees

एसटी महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांना नियमित पगार देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेऊन नुकतीच हमी दिली आहे. मात्र, असे असले तरी एसटी जगली तरच कामगार जगणार आहे. त्यामुळे आजारी असलेल्या एसटीला बळ देण्याची गरज असून त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता कामगार संघटनांकडून होत आहे.

Regular Salary Of ST Employee
Regular Salary Of ST Employee
author img

By

Published : Feb 22, 2023, 4:32 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर राज्य सरकारने कामगारांचे वेतन नियमित करण्यासाठी तजवीज केली आहे. त्यानुसार कामगारांना आता दरमहा त्यांचा पगार नियमित आणि वेळेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबद्दल राज्य शासनाचे एसटी कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले असले तरी मूळ दुःख मात्र कायम आहे. एसटी महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे एसटी महामंडळाचा संचित तोटा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

एसटीकडे डिझेलसाठी पैसे नाहीत : शेकडो गाड्या दुरुस्तीविना आगारात पडून आहेत. एसटीकडे डिझेल आणि देखभाल दुरुस्तीसाठी पैसे नाहीत म्हणून अनेक गाड्या मार्गावर धावत नाहीत, असे चित्र असताना एसटी महामंडळ टिकले पाहिजे, लाल परी गावागावात धावली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत एसटी महामंडळ स्वयंपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत एसटी कामगार स्वस्थ होणार नाही. एसटी महामंडळ टिकले तरच कामगार टिकणार आहेत. प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आजारी असलेल्या लाल परीला सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने तजवीज केली पाहिजे. एसटी महामंडळाचे विधीनीकरण शासनात शक्य नसेल तर, एसटीला अधिक मजबूत तरी करायला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या गाड्यांची स्थिती? : एसटी महामंडळाकडे जुन्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील शेकडो गाड्या थेट भंगारात काढण्या योग्य आहेत. सद्यस्थितीला एसटी महामंडळाकडे सुमारे पंधरा हजार गाड्या आहेत. यापैकी दहा हजारापेक्षा अधिक गाड्या या दहा लाख किलोमीटर पेक्षा अधिक अंतर धावलेल्या आहेत. त्यामुळे यातल्या हजारो गाड्या थेट निकामी होण्याची शक्यता असल्याने लाल परी यापुढे रस्त्यावर दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाकडे सध्या असलेल्या 15 हजार 600 गाड्यांपैकी प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या गाड्यांची संख्या पावणे तेरा हजारांच्या आसपास आहे.

नवीन गाड्यासाठी प्रतिक्षा : यामध्ये दहा वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या गाड्यांची संख्या सुमारे साडेआठ हजार इतकी आहे. अकरा वर्ष जुन्या झालेल्या गाड्यांची संख्या 5 हजार 375 बारा वर्षे जुन्या झालेल्या गाड्यांची संख्या 5 हजार 335 तेरा वर्ष जुन्या झालेल्या गाड्यांची संख्या 1 हजार 245 १४ वर्षे जुन्या झालेल्या गाड्यांची संख्या ३०३ तर पंधरा वर्षापेक्षा अधिक जुन्या झालेले गाड्यांची संख्या सव्वादोनशे आहे. दररोज सुमारे दीडशे पेक्षा अधिक गाड्या या दुरुस्तीसाठी डेपोत उभ्या ठेवाव्या लागतात. एसटीकडे बस गाड्या बांधणीसाठी स्वतःची साधनसामग्री नसल्याने या बस गाड्या बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी जातो त्यामुळे नवीन गाड्या एसटीच्या ताब्यात येण्यास नेहमीच प्रतीक्षा करावी लागते.

एसटीची आर्थिक स्थिती? : राज्यात आजही दररोज 33 लाखांपेक्षा अधिक प्रवासी एसटीने प्रवास करतात. एसटीचे दररोजचे सरासरी उत्पन्न हे 15 कोटी रुपये इतके आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज 25 कोटी रुपये एसटीचे उत्पादन होणे आवश्यक आहे. तरच एसटी नीट चालू शकते. त्यामुळे एसटीचा दररोजचा तोटा हा दहा कोटी रुपयांच्या आसपास आहे. एसटीचे सर्वसाधारण बजेट हे दहा हजार कोटींचे आहे. मात्र, वार्षिक तोटा हा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. हा तोटा कसा भरून काढायचा आणि एसटीला कशी सक्षम करायची हा मोठा प्रश्न असल्याने राज्य सरकारने याबाबत ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा एसटी कामगार संघटना व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - Shinde vs Thackeray Live Update : विधीमंडळ हे बाळासारखे आहे. तर राजकीय पक्ष आईसारखा-कपिल सिब्बल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.