मुंबई : दहावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. दरवर्षी मे महिन्यात ते जाहीर होतात. यंदा एक आठवडा उशीर झाला. त्यामुळे अकरावी प्रवेश देखील उशिरा सुरू झाले. आतापर्यंत प्रवेश अर्ज नोंदणी केल्यानंतर नियमित तीन फेऱ्या होतील आणि त्यानंतर विशेष फेऱ्या तीन होतील. आज पुणे विभागात दुपारपर्यंत 65 हजार 296 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यापैकी 44 हजार पेक्षा अधिक अर्ज लॉक केले गेले आहेत. तर ऑटोमॅटिक वेरिफाइड अर्जांची संख्या 20,472 इतकी आहे. शासनाच्या मदत केंद्रामधून 19676 अर्ज वेरिफाइड केले गेलेले आहे. तर फक्त 31 विद्यार्थ्यांचे मागे घेतले गेलेले आहेl. पुणे विभागाची क्षमता 87414 इतकी आहे , तर कोटाअंतर्गत जागा 25,306 इतक्या आहेत. पुणे विभागात एकूण विद्यार्थी क्षमता एक लाख 12 हजार 720 इतकी आहे. तर 322 महाविद्यालयांसाठी ऑनलाइन प्रवेश होतील.
व्हेरिफाइड अर्जांची संख्या अडीच हजार : नागपूर विभागाअंतर्गत 14,404 दुपारपर्यंत नोंदणी झाली आहे. त्यापैकी दहा हजार 75 लॉक केले आहेत. तर व्हेरिफाइड अर्जांची संख्या अडीच हजार पेक्षा जरा अधिक आहे. शासनाच्या मदत केंद्रावरून अर्ज वेरिफाइड झालेले आहेत. त्यांची संख्या 5744 इतकी. तर केवळ पाच विद्यार्थ्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. या विभागामध्ये एकूण विद्यार्थ्यांची क्षमता 38, 651 इतकी आहे. तर कोटाअंतर्गत क्षमता 14,829 इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची क्षमता या विभागात 53 हजार 480 इतकी आहे. नागपूर विभागात 194 कॉलेजसाठी हे अर्ज आहेत.
इतके विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले : मुंबई विभागात एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी संख्या सुमारे दोन लाख इतके आहेत. त्यापैकी एक लाख 39 हजार 700 इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झालेले आहेत. पैकी 72 हजार 334 व्हेरिफाइड झालेले आहेत. तर केंद्रांवरचे खात्री पडताळणी झालेल्या अर्ज 51,120 इतके आहे. आतापर्यंत केवळ 33 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज मागे घेतले. मुंबई विभागामध्ये एकूण विद्यार्थ्यांची क्षमता तीन लाख 78 हजार 555 इतकी आहे, तर 1016 महाविद्यालय आहेत.
कोटाअंतर्गत विद्यार्थ्यांची क्षमता : नाशिक विभागामध्ये एकूण 14,173 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी दहा हजार अर्ज लॉक पैकी अडीच हजार अर्ज खात्री पडताळणी झालेले आहे. तर शासकीय मदत केंद्रावरून साडेपाच हजार अर्ज पडताळणी झाले आहेत. नाशिक विभागात आतापर्यंत केवळ तीनच विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घेतले. नाशिक विभागात एकूण 2263 इतकी विद्यार्थ्यांची क्षमता आहे त्यापैकी कोटाअंतर्गत क्षमता साडेचार हजार इतके आहे.
अमरावती विभागाच्या विद्यार्थ्यांची क्षमता : अमरावती विभाग अंतर्गत 6043 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यापैकी 50000 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केलेले आहेत. एकूण 4000 अर्जांची खात्री पडताळणी झालेली आहे. तर एकच विद्यार्थ्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. अमरावती विभागात एकूण 65 महाविद्यालयामध्ये हे प्रवेश होतील. अमरावती विभागाच्या विद्यार्थ्यांची एकूण क्षमता 14,760 इतकी आहे त्यापैकी कोटाअंतर्गत 3897 इतकी क्षमता आहे.
हेही वाचा -