ETV Bharat / state

'एनआयए'ने सचिन वाझेला कळवा रेल्वेस्टेशनवर आणून घेतली महत्त्वाची माहिती - सचिव वाझे ब्रेकिंग न्यूज

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेला कळवा येथे एनआयएच्या टीमने आणले. येथे वाझेची चौकशी करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

vaze
वाझे
author img

By

Published : Apr 7, 2021, 11:31 AM IST

ठाणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) टीम काल रात्री अचानक सचिन वाझेला घेऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून थेट ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली. येथे बराच वेळ एनआयएच्या टीमने सचिन वाझेची चौकशी केली. कळवा पश्चिम रेल्वे स्थानकावरून बाहेर पडणाऱ्या मार्गावर एनआयएच्या टीमने सचिन वाझेला चालायला लावले. तर एनआयएची टीम येण्याआधीच स्थानिक ठाणे पोलिसांनी कळवा रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप दिले होते. एवढेच नाही तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ही कळवा रेल्वे स्थानकापासून दूर उभे केले होते.

चार मार्चच्या रात्री सचिन वाझे कळव्यात येऊन गेला होता, त्याचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले

वाझेचा कळव्याशी काय संबंध?

एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन नेमका काय तपास करत होती? याचा थांगपत्ता लागत नव्हता. बराच काळ वाझेची चौकशी केल्यानंतर एनआयएची टीम कळवा रेल्वे स्थानकावरून निघून गेली. या सगळ्या नाट्यरुपांतरा दरम्यान एनआयए एका महत्त्वाच्या गोष्टीचा तपास करत होती, ते म्हणजे 4 मार्च रात्री सचिन वाझे मुंबईतील मुंबई पोलीस आयुक्तालयात त्याचा मोबाईल चार्जिंगला ठेवला होता. तिथे एका माणसाला उभा केला होता. कोणी फोन केला तर साहेब व्यस्त आहेत, असे सांग हे त्या व्यक्तीला सचिन वाझेने सांगितले होते. सचिन वाझे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागच्या गेटने निघाला होता. यानंतर त्याने थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठले आणि तेथून रेल्वेने सचिन वाझे हा कळवा रेल्वे स्थानकावर उतरला होता. तिथे उतरल्यानंतर तो कोणत्या वाहनाने गेला? याचा तपास करायचा होता, अशी माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली. तसेच, कळवा रेल्वे स्थानक ते मुंब्रा रेतीबंदर म्हणजे ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता, त्या ठिकाणापर्यंत; तसेच माजिवडा सर्कलपर्यंत किती वेळ लागतो आणि किती वेळात परत येता येते? सचिन वाझेसोबत कळवा रेल्वे स्थानक, माजिवडा सर्कल आणि मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे किती लोक होते? त्यांनी कसा कट रचला? मनसुख यांना कोणी कुठे मारले? त्यानंतर मनसुख यांना कोणत्या गाडीत बसवून मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे नेण्यात आले? तिथे बेशुद्धावस्थेत असलेल्या मनसुख यांना खाडीत कसे फेकण्यात आले? सचिन वाझेची मनसुख हिरेन यांच्या हत्येत नेमकी काय भूमिका होती? यासंबंधीची सर्व चौकशी एनआयएला करायची होती. त्यासाठी सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम कळवा रेल्वे स्थानकावर आली होती, अशी माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, नाट्यरूपांतर करून सचिन वाझे विरोधात एनआयएने भक्कम पुरावे जमवल्याचेही समोर आले आहे.

म्हणून विनायक शिंदेंची वसूली बंद?

कळव्यात राहणाऱ्या विनायक शिंदे याची कळवा परिसरामध्ये अनेक ठिकाणी वसुली सुरू होती. याचा प्रत्यय ठाण्यातल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आला होता. मात्र, मनसुख यांची हत्या झाल्यानंतर विनायकने कोणतीही वसुली केली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - शिक्षकांच्या लसीकरणात महापालिकेकडून भेदभाव, १०-१२वीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता

हेही वाचा - पवनारच्या आशा वर्करांच्या कामाची 'टाईम'ने घेतली दखल; मानधन वाढीसाठी सरकारकडे 'आशा'च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.