ETV Bharat / state

धक्कादायक..! रॅपिड अ‌ॅन्टीजेन चाचणींचा अहवालच बनावट; अमरावतीतील ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द - रॅपिड अ‌ॅन्टीजेन चाचणी अहवाल बोगस अमरावती

आरोग्य विभागाने याबाबत केलेल्या तपासणीत काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर बनावट अहवाल नोंदवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 10, 2021, 10:35 PM IST

Updated : Mar 10, 2021, 10:51 PM IST

मुंबई - अमरावती जिल्ह्यात रॅपिड अ‌ॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवाल तपासणीत तफावत आढळून आली. आरोग्य विभागाने याबाबत केलेल्या तपासणीत काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर बनावट अहवाल नोंदवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

१ कोटी ७० लाख आरटीपीसीआर चाचण्या

कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अ‌ॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानली जाते. या आरटीपीसीआर चाचणीने ६० ते ६५ टक्के तर रॅपिड अ‌ॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे ३० ते ३५ टक्के इतके अचूक निदान होते. राज्यात आरटीपीसीआर अंतर्गत (ता.९) मंगळवारपर्यंत एकूण १ कोटी ७० लाख १२ हजार ३१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. अमरावतीमधील ११ प्रयोगशाळांवर कारवाई केली असून अकोला, वाशिम जिल्ह्यात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे टोपे म्हणाले.

राज्यात एकूण ५१७ प्रयोगशाळा मान्यताप्राप्त

कोविड काळात राज्यात एनआयए, पुणे ही एकमेव प्रयोगशाळा कोविड-१९ निदानासाठी कार्यरत होती. आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता दिली आहे. राज्यात आजपर्यंत ३७६ शासकीय आणि १४१ खासगी अशा एकूण ५१७ प्रयोगशाळा मान्यताप्राप्त आहेत. या प्रयोगशाळांपैकी ९८ शासकीय आणि १२० खासगी अशा एकूण २१८ प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर चाचणी केली जाते. या प्रयोगशाळांच्या कामाची गुणवत्ता आणि तपासणी, आयसीएमआरने कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई व एनआयव्ही, पुणे या दोन प्रयोगशाळांना मार्गदर्शनासाठी मेन्टॉर म्हणून निवडले आहेत. जिल्हास्तरीय नियंत्रण अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे शल्य चिकित्सक यांची नेमणूक केली आहे.

बनावट रिपोर्ट यायला 'ही' आहेत कारणे

  • दोन वेगवेगळ्या कालावधीत घेतलेल्या नमुन्यांमध्ये विषाणूंची संख्या अत्यल्प असल्यास चाचणीच्या निदानात तफावत येते.
  • इतर कारणांमुळे नमुना दूषित झाल्यास, निदान पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.
  • तपासणीसाठी नमुना घेतल्यानंतर थंड ठिकाणी व्यवस्थितरित्या न ठेवल्यास आणि तो प्रयोगशाळेत आल्यास चुकीचे निदानाची शक्यता असते.
  • संबंधित प्रयोगशाळा वापरत असलेल्या टेस्ट किट्सच्या संवेदनशीलतेवरही निदानाची अचूकता अवलंबून असते.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरेच सचिन वझेंचे वकील - देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - राज्यात नव्या वर्षातील आज सर्वाधिक रुग्णवाढ; अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे

Last Updated : Mar 10, 2021, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.